जळगाव : ‘रणरागिणी झाशीच्या राणीचा विजय असो…, जय भवानी जय शिवाजी…’ या घोषणांच्या गजरात अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहुर्तावर येथील सुभाष चौकातील श्री भवानीदेवीच्या मंदिरात हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखा कार्यान्वित झाली. या वेळी हिंदूंच्या धर्मपरंपरांचे रक्षण करण्यासाठी आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत रहाण्याची उपस्थित रणरागिणींनी शपथ घेतली. या प्रसंगी जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांच्या हिंदु जनजागृती समितीच्या समन्वयक कु. रागेश्री देशपांडे, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या उपजिल्हाध्यक्ष सौ. मंगला बारी यांनी उपस्थितांना संबोधित केले. शंखनाद आणि शक्तीस्तवन करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. यानंतर भवानीदेवीची ओटी भरण्यात आली, तसेच हिंदु स्त्रियांमधील वीरश्री जागवण्यासाठी सौ. मंगला बारी यांच्या हस्ते श्री भवानी तलवारीचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. पूजा जाधव यांनी केले.
हिंदु स्त्रियांमधील धैर्य, शौर्य आणि आग जागवण्यासाठी रणरागिणी शाखा सज्ज ! – रणरागिणी कु. रागेश्री देशपांडे
क्रांतीकारी स्त्रियांचा आदर्श घेऊन राष्ट्र-धर्म यांच्या रक्षणासाठी आणि हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी स्त्रीशक्तीने जागृत होऊन संघर्ष करायला हवा. चारित्र्यसंपन्न राष्ट्राच्या उभारणीसाठी राष्ट्र आणि धर्म प्रेमी महिलांनी रणरागिणी शाखेत सहभागी व्हावे.
संकटकाळी रात्री २ वाजता बोलावले, तरी साहाय्यासाठी धावून येईन ! – रणरागिणी सौ. मंगला बारी, शिवसेना
हिंदुत्व, हिंदु परंपरा यांच्या रक्षणासाठी मी सदैव तत्पर असून प्रत्येक महिलेनेच आता तत्पर रहाण्याची आवश्यकता आहे. लव्ह जिहादमध्ये अडकलेल्या मुलींना वाचवण्यासाठी आणि लव्ह जिहादींना धडा शिकवण्यासाठी आपण आता एक व्हायला पाहिजे. कोणतेही संकट आल्यास रात्री २ वाजताही जरी मला तुम्ही साहाय्यासाठी हाक दिली, तरी त्या वेळी मी तुमच्या साहाय्यासाठी धावून येईन !
क्षणचित्रे
१. श्री भवानीमाता मंदिराचे पुजारी श्री. महेश महाराज त्रिपाठी यांनी रणरागिणी शाखेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंदिरात १३१ श्रीफळांचे वाटप केले.
२. मंदिरात येणार्या काही भाविकांनी ‘सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीची मुले धर्मकार्य करतांना दिसायची. आता महिलाही इतक्या मोठ्या प्रमाणात संघटित होऊन कार्य करत असल्याचे पाहून समाधान वाटले. महिलांचे संघटन ही काळाची आवश्यकता आहे’, असे सांगितले.
स्वधर्म रक्षणासाठी महिलांनी घेतला शस्त्रधारी आई भवानीचा आदर्श !
शपथ आम्हास माय भवानीची, आई महालक्ष्मीची आणि त्या सह्याद्रीची, श्वास अखेरचा असेपर्यंत संग्राम आम्ही करणार…
राष्ट्र-धर्माच्या रक्षणासाठी तलवार हाती घेणार…तलवार हाती घेणार…
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात