-
कानपूरमध्ये गुन्हा नोंद !
-
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष असलेले बिबेक देबरॉय यांच्या लेखात चित्र छापल्याने त्यांच्याकडून ‘द वीक’च्या ‘स्तंभकार’ पदाचे त्यागपत्र !
- हिंदु देवतांचे विडंबन करणारी ‘द वीक’सारखी नियतकालिके कधीतरी मुसलमान किंवा ख्रिस्ती यांच्या श्रद्धास्थानांचा अनादर करतात का ? हिंदूंच्याच पैशांवर मोठ्या झालेल्या अशा नियतकालिकांवर आता हिंदूंनी बहिष्कार घालून त्यांना वठणीवर आणले पाहिजे !
- हिंदूबहुल भारतात देवतांचा अवमान करणार्यांना कठोरात कठोर शिक्षा करणारा कायदा नसल्यानेच ऊठसूठ कुणीही हिंदूंच्या देवतांचा अवमान करतो. केंद्र सरकारने आता तरी असा कायदा केला पाहिजे !-संपादक
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)
नवी देहली – प्रसिद्ध साप्ताहिक ‘द वीक’ने भगवान शंकर आणि कालीमाता यांचे अत्यंत अश्लाघ्य चित्र छापले आहे. यावरून हिंदूंकडून ‘द वीक’च्या विरोधात प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असून भाजपचे नेते प्रकाश शर्मा यांनी कानपूरमध्ये सदर नियतकालिकाच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे.
Bibek Debroy quits The Week as their columnist after it uses offensive Maa Kali image as his article image: Details of the letterhttps://t.co/YVCrziZxsv
— OpIndia.com (@OpIndia_com) August 4, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध लेखक बिबेक देबरॉय यांचा ‘द वीक’मध्ये लेख प्रकाशित करण्यात आला होता. ‘द फायर हॅज सेव्हेन टंग्ज अँड वन ऑफ दीज इज मां काली !’ (अग्नीच्या ७ जीभ असून कालीमाता ही त्यांतील एक आहे !) या मथळ्याखाली प्रकाशित आध्यात्मिक लेखामध्ये भगवान शंकर आणि कालीमाता यांचे अत्यंत अश्लाघ्य चित्र प्रकाशित करण्यात आले. हे कळाल्यावर देबरॉय व्यथित झाले आणि त्यांनी या नियतकालिकाच्या स्तंभलेखक पदाचे त्यागपत्र देण्याचे ४ ऑगस्ट या दिवशी ट्वीट करून घोषित केले.
हा लेख २४ जुलै या दिवशी प्रकाशित करण्यात आला असून ‘द वीक’ संकेतस्थळावरील संबंधित लेखाच्या मार्गिकेवर गेले असता ४ ऑगस्ट या दिवशी कालीमातेचे चित्र पालटण्यात आले असल्याचे आढळून आले.
‘द वीक’च्या नैतिकतेविषयी प्रश्नचिन्ह ! – देबरॉययाविषयी देबरॉय म्हणाले, ‘‘अशा प्रकारचे चित्र छापण्याऐवजी कालीमातेची अनेक चांगली चित्रे प्रकाशित करता आली असती. प्रसिद्ध केलेल्या चित्रासाठी माझी अनुमती घेण्यात आली नाही.
अशा चित्रांच्या माध्यमातून ‘द वीक’ हे लोकप्रियता वाढवण्याचा प्रयत्न करत असले, तरी यातून लोकांच्या भावना भडकावण्याचा आणि त्यांना चिथावण्याचा प्रयत्न केला आहे. या माध्यमातून ‘द वीक’च्या नैतिकतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विश्वास निर्माण करण्यासाठी काही काळ जावा लागतो; परंतु अशी कृती विश्वासास तडा देते. मी ‘द वीक’मधील ‘स्तंभलेखक’ या पदाचे त्यागपत्र देत आहे.’’ |
स्रोत: दैनिक सनातन प्रभात