Menu Close

चित्रपटाला ‘हम दो हमारे बारह’ असे शीर्षक देणे, हा इस्लामोफोबिया’ – राणा अय्युब, पत्रकार

भारतात लोकसंख्यावाढ नेमकी कुणामुळे होत आहे, हे सर्वश्रुत असतांना त्यात ‘इस्लामफोबिया’ कुठे आला ? प्रत्येक घटनेकडे धर्माच्या दृष्टीकोनातून पहाणारे पत्रकार म्हणे धर्मनिरपेक्ष ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

(इस्लामोफोबिया, म्हणजे इस्लामचा तिरस्कार)

मुंबई – ‘हम दो हमारे बारह’ या नवीन चित्रपटाचे केवळ ‘पोस्टर’ (फलक) प्रदर्शित झाल्यावर ‘आमच्या समाजाला लक्ष्य करण्यात आले आहे’, असा आरोप मुसलमान समाजाने केला आहे. पत्रकार अयुब राणा यांनी ट्वीटद्वारे या चित्रपटाविषयी म्हटले, ‘‘ज्या चित्रपटात मुसलमान समाज लोकसंख्यावाढीस कारण असल्याचे दाखवले जाते, त्या चित्रपटाला चित्रपट परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड) अनुमती कशी देते ? चित्रपटात मुसलमान समाजाला लक्ष्य करण्यात आले आहे. एका मुसलमान कुटुंबाचे छायाचित्र वापरून त्यावर ‘हम दो हमारे बारह’ असे शीर्षक देणे, म्हणजे इस्लामोफोबिया आहे.’’

चित्रपटाच्या या ‘पोस्टर’मध्ये ‘लवकरच चीनला मागे टाकू’, अशी ओळही दिलेली आहे. चित्रपटात अभिनेते अन्नू कपूर हे मुख्य भूमिका साकारत आहेत. चित्रपटाच्या ‘पोस्टर’मध्ये मध्यभागी बसलेल्या अन्नू कपूर यांच्या शेजारी काही महिला, पुरुष, लहान मुले, तसेच अधिवक्ते दिसत आहेत.

चित्रपटाच्या ‘पोस्टर’कडे योग्य दृष्टीकोनातून पहाणे आवश्यक ! – दिग्दर्शक कमल चंद्रा

लोकसंख्यावाढ या विषयावर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या ‘पोस्टर’वर अनेकांनी टीका केली आहे. दिग्दर्शक कमल चंद्रा म्हणाले, ‘‘चित्रपटाचे ‘पोस्टर’ आक्षेपार्ह नाही. त्याकडे योग्य दृष्टीकोनातून पहाणे आवश्यक आहे. हा चित्रपट वाढत्या लोकसंख्येवर आधारित आहे. कोणत्याही समुदायाला लक्ष्य न करता तो निर्माण करण्यात आला आहे.’’

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *