Menu Close

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विविध स्तरांवर देण्यात आले निवेदन !

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कार्यवाही करा !

सांगली – स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सांगली जिल्ह्यात प्रशासन, पोलीस आणि शाळा-महाविद्यालय यांना निवेदन सादर करण्यात आले. (असे निवेदन का द्यावे लागते ? प्रशासन स्वतःहून कृती का करत नाही ? – संपादक)

१. जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.

प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड (डावीकडे) यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई (उजवीकडे)

२. तासगाव येथे नगर परिषदेत कार्यालयीन अध्यक्षा वर्षा भानुदास कुंडले यांनी, तर पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी संजीव झाडे यांनी निवेदन स्वीकारले. तहसील कार्यालयातही निवेदन देण्यात आले. या प्रसंगी शिवसेनाप्रणित ‘शिवसामर्थ्य सेने’चे सांगली जिल्हा उपाध्यक्ष श्री. पुरण मलमे, समितीचे श्री. सचिन कुलकर्णी यांसह अनेक राष्ट्रप्रेमी नागरिक उपस्थित होते.

तासगाव येथे कार्यालयीन अधीक्षक वर्षा भानुदास कुंडले (डावीकडे) यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते
तासगाव येथे पोलीस निरीक्षक संजीव झाडे (डावीकडे) यांना निवेदन देतांना श्री. पुरण मलमे, श्री. गजानन खेराडकर आणि श्री. सचिन कुलकर्णी

३. जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) येथे तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ यांना निवेदन देण्यात आले. शिरोळ येथे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांना, तसेच‘ श्री पद्माराजे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज’चे प्राचार्य सी.एस्. पाटील यांना निवेदन देतांना धर्मप्रेमी सर्वश्री मंदार पाटुकले आणि विनय चव्हाण उपस्थित होते.

जयसिंगपूर येथे तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ (डावीकडे) यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

४. जत येथे पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक सुरेखा पिसाळ, तर तहसील कार्यालयात तहसीलदार जीवन बनसोडे यांना, तसेच ‘रामराव विद्यामंदिर हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज’मध्ये निवेदन देण्यात आले.

जत येथे ‘रामराव विद्यामंदिर हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज’ मधील शिक्षकांना निवेदन देतांना सनातन संस्थेच्या साधिका सौ. नीला हत्ती अन् सौ. संगिता पट्टणशेट्टी

५. मिरज येथे प्रांताधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार नारायण मोरे यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी शिवसेना व्यापारी सेनेचे सर्वश्री पंडित (तात्या) कराडे आणि पराग नाईक, बजरंग दलाचे मिरज तालुका संघटक श्री. आकाश जाधव, युवासेनेचे श्री. अक्षय मिसाळ, दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक श्री. विठ्ठल मुगळखोड यांसह अन्य उपस्थित होते.

मिरज येथे नायब तहसीलदार नारायण मोरे (उजवीकडे) यांना निवेदन देतांना राष्ट्रप्रेमी

६. सांगली येथे भाजपच्या नगरसेविका सौ. सुनंदा राऊत यांना निवेदन देण्यात आले.

सांगली येथे भाजपच्या नगरसेविका सौ. सुनंदा राऊत (उजवीकडे) यांना निवेदन देतांना सौ. स्मिता माईणकर आणि श्रीमती मधुरा तोफखाने
शिरोळ येथील ‘श्री पद्माराजे विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज’चे प्राचार्य सी.एस्. पाटील (डावीकडे) यांना निवेदन देतांना श्री. मंदार पाटुकले, श्री. विनय चव्हाण आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय घाटगे
शिरोळ येथे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे (डावीकडे) यांना निवेदन देतांना श्री. मंदार पाटुकले, श्री. विनय चव्हाण आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय घाटगे

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *