स्वतःच्या अधिकार्याला विष पाजणार्या पाकला अमेरिका साहाय्य करते, याचा अर्थ भारताने काय घ्यावा ?
वॉशिंग्टन : अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएच्या पाकमधील प्रमुखाला पाकच्या गुप्तचर संस्था आयएस्आयने विष दिल्याची घटना समोर आली आहे. मार्क केल्टन असे या अधिकार्याचे नाव असून तो मे २०११ मध्ये अल-कायदा या जिहादी संघटनेचा प्रमुख ओसामा बिन लादेन याला मारण्याच्या मोहिमेचे नेतृत्व करत होता. पाकच्या एबटाबादमध्ये केल्टन यांनी २ मास बिन लादेनच्या परिसराची छापेमारी केली होती.
१. वॉशिंग्टन पोस्टने प्रसारित केलेल्या एका विशेष अन्वेषण अहवालानुसार, मार्क केल्टन यांनी २ मास केलेल्या छापेमारीनंतर त्यांचे स्वास्थ्य बिघडू लागल्याने त्यांना तेथून काढण्यात आले.
२. आता केल्टन सीआयएतून निवृत्त झाले असून त्यांच्या पोटाचे शस्त्रकर्म झाले आहे. परिणामी त्यांचे स्वास्थ्य सुधारले आहे.
३. सीआयएच्या काही अधिकार्यांचे म्हणणे आहे की, केल्टन यांच्या प्रकृतीत अचानक झालेल्या बिघाडामागे आयएस्आयने त्यांना विष दिले असावे; परंतु अमेरिकेतील पाक दूतावासाच्या एका प्रवक्त्याने हा अहवाल फेटाळून लावला आहे.
४. द पोस्ट या वृत्त संकेतस्थळानुसार, अनेकदा विनंती करूनही केल्टन यांनी या प्रकरणासंदर्भात मुलाखत देण्याचे टाळले; परंतु त्यांच्याशी दूरभाषवर झालेल्या संभाषणात त्यांनी सांगितले की, माझी प्रकृती नेमकी का बिघडली, यामागील कारण कधीच स्पष्ट होऊ शकले नाही; परंतु मी पहिली व्यक्ती नाही, जिला असा संशय आला की, मला विष पाजले गेले असावे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात