Menu Close

एक पक्ष, एक संघटना आणि एक नेता देशात पालट घडवून आणू शकत नाही – डॉ. मोहन भागवत, सरसंघचालक

डॉ. मोहन भागवत, सरसंघचालक

नागपूर – केवळ एक नेता देशासमोरील सर्व समस्यांचा सामना करू शकत नाही, तसेच एक संघटना अथवा पक्षही देशात पालट घडवून आणू शकत नाही. सामान्य माणूस रस्त्यावर उतरला, तेव्हाच देशाला स्वातंत्र्य मिळाले. हा संघ विचारांचा मूळ गाभा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. ९ ऑगस्ट या दिवशी विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यास वर्ष १८५७ च्या राष्ट्रीय उठावाने प्रारंभ झाला; परंतु जेव्हा देशभरात जनजागृती होऊन जनता रस्त्यावर उतरली, तेव्हाच हा स्वातंत्र्य लढा यशस्वी झाला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासह सर्वच भारतीय क्रांतीकारकांचेही लढ्यात अमूल्य योगदान होते. नेता समाज घडवत नाही. समाज नेता घडवतो. देशातील परिस्थितीत सुधारणा घडवण्याचे ‘कंत्राट’ दुसर्‍याला देऊन चालणार नाही. संघालाही हे ‘कंत्राट’ देऊ नका. प्रत्येकाने आपले दायित्व पार पाडले पाहिजे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *