-
स्वातंत्र्यदिनी घातपात घडवण्याचा कट उघड
-
अटकेतील आतंकवादी सबाउद्दीन आझमी हा ‘एम्.आय.एम्.’चा सक्रीय सदस्य
- देशाच्या मूळावर उठलेल्या अशा आतकंवाद्यांना फाशी होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे !
- अटकेतील आतंकवादी जर ‘एम्.आय.एम्.’चा सक्रीय सदस्य असेल, तर अशा पक्षावरही सरकारने बंदी घातली पाहिजे ! -संपादक, दैनिक सनातन प्रभात
आझमगड (उत्तरप्रदेश) – कट्टर जिहादी आतंकवादी संघटना ‘इस्लामिक स्टेट’चा आतंकवादी सबाउद्दीन आझमी याला आतंकवादविरोधी पथकाने (‘ए.टी.एस्.’ने) येथून अटक केली. सबाउद्दीन आझमी ‘इस्लामिक स्टेट’साठी आतंकवाद्यांची भर्ती करणारा आतंकवादी अबू उमर याच्या थेट संपर्कात होता, असे ‘ए.टी.एस्.’च्या अन्वेषणात समोर आले आहे. त्याच्या माध्यमातून तो आतकंवादी अबू बकर अल् शामी याच्या संपर्कात आला आणि त्याने ‘हँडग्रेनेड’, बाँब इत्यादी बनवण्याचे प्रशिक्षण घेतले. सबाउद्दीनने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यांना लक्ष्य करण्यासाठी फेसबूक खाते सिद्ध केले होते. स्वातंत्र्यदिनी घातपात घडवून आणण्याचा त्याचा कट होता.
ISIS terrorist planning to strike terror on Independence day arrested from UP's Azamgarh https://t.co/Gd1XVLdW97
— Republic (@republic) August 9, 2022
सबाउद्दीन आझमी हा टेलिग्राम या सामाजिक माध्यमाद्वारे ‘अल् शकर मीडिया’च्या माध्यमातून मुसलमान तरुणांचा बुद्धीभेद करत होता. सबाउद्दीन हा खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या ‘एम्.आय.एम्.’ पक्षाचा सक्रीय सदस्य आहे. सबाउद्दीन घरी राहून विणकाम करत होता. ५ वर्षांपूर्वी तो मुंबईला गेला होता. भारतात ‘इस्लामिक स्टेट’ सारखी संघटना सिद्ध करण्याची त्याची योजना होती. त्याने स्फोटके बनवण्याची पद्धतही शिकून घेतली होती.
आतंकवादविरोधी पथकाने ३ आतंकवाद्यांना कह्यात घेतले होते. यामध्ये सबाउद्दीनसह अबू होमैद आणि अयान यांचा समावेश आहे. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे, असे वृत्त ‘अमल उजाला’ ने प्रसिद्ध केले आहे.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात