Menu Close

(म्हणे) ‘पाकव्याप्त काश्मीर स्वतंत्र आहे, तर भारतातील काश्मीरमध्ये सर्वत्र सशस्त्र पोलीस !’

केरळचे माकपचे नेते के.टी. जलील यांचे देशविरोधी विधान

  • काश्मीरमध्ये सशस्त्र पोलीस ठेवावे लागण्याची स्थिती निर्माण व्हायला जलील यांच्यासारखे पाकप्रेमीच कारणीभूत आहेत !
  • असे विधान केल्याच्या प्रकरणी जलील यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहातच टाकायला हवे ! -संपादक 
के.टी. जलील

थिरूवनंतपूरम् (केरळ) – काश्मीरमध्ये प्रत्येक ठिकाणी बंदुका घेऊन उभे असलेले सैनिक आढळतात. पोलिसांकडेही बंदुका आहेत. सामान्य लोकांच्या चेहर्‍यावर उदासीनता नव्हती; मात्र त्यांना पाहून असे वाटत होते की, ते हसणे विसरले आहेत. दुसरीकडे पाकव्याप्त काश्मीर ‘स्वतंत्र काश्मीर’ म्हणून ओळखले जाते. हा भाग पाक सरकारच्या थेट नियंत्रणात नाही, अशी ‘फेसबूक पोस्ट’ केरळचे माजी मंत्री आणि माकपचे नेते के.टी. जलील यांनी त्यांच्या काश्मीर दौर्‍यांनतर केली. त्यांच्या या विधानावर भाजपने टीका केली आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *