Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांत प्रशासन, पोलीस आणि शाळा-महाविद्यालये यांना निवेदन !

१५ ऑगस्टनिमित्त ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ मोहीम !

नंदुरबार येथील पोलीस उपअधीक्षक विश्वास वळवी यांना निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते

जळगाव, ११ ऑगस्ट (वार्ता.) – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या वर्षी सरकारच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबवण्यात येत आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. तरी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पाऊले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील प्रशासन, पोलीस आणि शाळा-महाविद्यालय यांना निवेदन सादर करण्यात आले.

नंदुरबार येथील उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते
धुळे येथील सुदंरबाई छगनलाल बाफना प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांना निवेदन देतांना धर्मप्रेमी युवती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील पोलीस निरीक्षक अवतारसिंह चौहान, गटशिक्षणाधिकारी भावना भोसले, नायब तहसीलदार सचिन बाभळे, चाळीसगाव येथील तहसीलदार अमोल मोरे, भुसावळ येथील प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, धुळे येथील उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपशिक्षणाधिकारी मिनाक्षी गिरी, नंदुरबार येथील पोलीस उपअधीक्षक विश्वास वळवी, उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. युनूस पठाण, शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत पाटील या प्रशासकीय अधिकार्‍यांसह जळगाव जिल्ह्यात ६० हून अधिक, धुळे जिल्ह्यात ७ आणि नंदुरबार जिल्ह्यात ४ शाळांमध्ये, तसेच जळगावमधील २ महाविद्यालयांत निवेदन देण्यात आले.

जळगाव येथील काशीबाई उखाजी कोल्हे माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकांना निवेदन देतांना धर्मप्रेमी
धुळे जिल्हा उपशिक्षणाधिकारी मिनाक्षी गिरी यांना निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते

या वेळी जळगाव येथे सर्वश्री आकाश चव्हाण, विनोद सपकाळे, भूषण पाटील, इमरतसिंग पावर, भिकन मराठे, मंदार जोशी, रामकृष्ण चौधरी, दिगंबर माळी, राजेंद्र वराडे, सुभाष देवकर, भूषण पाटील, अमोल पाटील, चेतन पाटील, प्रमोद पाटील सौ. अरुणा महाजन, सौ. निर्मलाबाई पाटील, सौ. जानकी वाघ, सौ. वर्षा पाटील, धुळे येथे सर्वश्री भैया माळी, गोपाल शर्मा, गौरव जाधव, पियुष खंडेलवाल, सौ. माधुरी मुरतोडकर, अधिवक्ता गायत्री वाणी, खुशी देशमुख, गौरी वाणी, तर नंदुरबार येथे सर्वश्री सुमित परदेशी, गौरव धामणे, आकाश गावित, सौ. धनश्री कुलकर्णी आणि कु. उमा कदम हे धर्मप्रेमी उपस्थित होते.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *