विश्व हिंदु परिषदेकडून केंद्रशासनाला समयमर्यादा
इंदूर (मध्यप्रदेश) : अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी विश्व हिंदु परिषदेने केंद्रशासनाला ३१ डिसेंबरपर्यंत समयमर्यादा दिली आहे. आम्ही राममंदिराच्या उभारणीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पहाणार नाही.
३१ डिसेंबरच्या आत राममंदिराच्या उभारणीला प्रारंभ झाला पाहिजे. त्यानंतर आम्ही आमच्या संयमावर नियंत्रण ठेवू शकणार नाही, अशी चेतावणी विश्व हिंदु परिषदेचे महासचिव चंपत राय यांनी उज्जैन येथील सिंहस्थपर्व क्षेत्रात झालेल्या मेळाव्यात दिली. सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्या राममंदिर प्रकरणी सुनावणी चालू आहे. ती जूनपर्यंत पूर्ण होईल, अशी आम्हाला आशा आहे, असेही राय म्हणाले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात