Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यात प्रशासकीय अधिकारी, पोलीस आणि हिंदुत्वनिष्ठ यांना बांधली राखी !

रत्नागिरी, १२ ऑगस्ट (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रत्नागिरी, चिपळूण, राजापूर आणि दापोली या तालुक्यांतील प्रशासकीय अधिकारी, पोलीस आणि हिंदुत्वनिष्ठ यांना राखी बांधण्यात आली. ‘भावाचा उत्कर्ष व्हावा आणि भावाने बहिणीचे संरक्षण करावे’, या भूमिकेतून रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. याचाच एक भाग म्हणून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हा उपक्रम ११ ऑगस्ट या दिवशी राबवण्यात आला.

रत्नागिरी

रत्नागिरी जिल्हाधिकारी डॉ. बी.एन्. पाटील यांना राखी बांधतांना समितीच्या सौ. मधुरा खेराडे

१. जिल्हाधिकारी डॉ. बी.एन्. पाटील यांना समितीच्या सौ. मधुरा खेराडे यांनी राखी बांधली. या वेळी श्री. चंद्रशेखर गुडेकर यांनी समितीच्या उपक्रमाविषयी माहिती दिली. या वेळी जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, ‘‘समितीचे उपक्रम पुष्कळ चांगले आहेत. माझ्याकडून काही साहाय्य लागल्यास जरूर सांगा. आपत्कालीन व्यवस्थापनाच्या अंतर्गत समितीच्या २५ जणांना प्रशिक्षण देऊ शकतो.’’

रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांना राखी बांधतांना समितीच्या सौ. मधुरा खेराडे

२. पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी राखी बांधल्यानंतर त्यांनीही समितीचे कार्य जाणून घेतले. डॉ. गर्ग म्हणाले, ‘‘तुमचे उपक्रम चांगले आहेत. माझे तुम्हाला सहकार्य राहील. तुम्ही केव्हाही माझ्याकडे येऊ शकता.’’

रत्नागिरी येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. दीपकसिंह देवल यांना राखी बांधतांना समितीच्या सौ. मधुरा खेराडे

३. हिंदुत्वनिष्ठ मरुधर समाजाचे अध्यक्ष श्री. दीपकसिंह देवल यांना समितीच्या सौ. मधुरा खेराडे यांनी राखी बांधली. श्री. देवल म्हणाले की, समितीच्या उपक्रमांना आम्ही नेहमीच सहकार्य करू. कार्यासाठी मरुधर समाज भवन हे सभागृह विनामूल्य उपलब्ध करून देऊ.

या उपक्रमात समितीच्या कु. कृपाली भुवड आणि श्री. चंद्रशेखर गुडेकर सहभागी झाले होते.

चिपळूण येथे प्रांताधिकारी श्री. प्रवीण पवार, पोलीस निरीक्षक श्री. रवींद्र शिंदे, निवासी नायब तहसीलदार श्री. टी.एस्. शेजाळ यांना सौ. उज्ज्वला कांगणे यांनी राखी बांधली. या वेळी समितीचे विश्‍वनाथ पवार आणि सुरेश शिंदे उपस्थित होते.

चिपळूण येथे प्रांताधिकारी श्री. प्रवीण पवार यांना राखी बांधतांना सौ. उज्ज्वला कांगणे
चिपळूण पोलीस निरीक्षक श्री. रवींद्र शिंदे यांना राखी बांधतांना सौ. उज्ज्वला कांगणे
चिपळूण निवासी नायब तहसीलदार श्री. टी.एस्. शेजाळ यांना राखी बांधतांना सौ. उज्ज्वला कांगणे

राजापूर येथे गटविकास अधिकारी श्री. सुहास पंडित आणि पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांना सौ. श्‍वेता सिनकर यांनी राखी बांधली. १५ ऑगस्टच्या निमित्ताने जिल्ह्यात चालू असलेल्या ‘क्रांतीगाथा प्रदर्शन आणि व्याख्यान’ संदर्भात माहिती दिल्यानंतर ‘असे प्रदर्शनाचे आयोजन करू शकतो,’ असे श्री. परबकर यांनी सांगितले.

राजापूर येथे गटविकास अधिकारी श्री. सुहास पंडित यांना राखी बांधतांना सौ. श्‍वेता सिनकर
राजापूर पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांना राखी बांधतांना सौ. श्‍वेता सिनकर

दापोली येथे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिलिंद चव्हाण यांना सौ. सुहासिनी डोंगरकर यांनी राखी बांधली.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *