वादळातही यज्ञशाळा सुरक्षित रहाते, याविषयी अंनिसला काय म्हणायचे आहे ?
उज्जैन : येथील सिंहस्थपर्वातील बडनगर मार्ग, रामघाटाजवळ श्री महाकाल भक्त साधना आश्रमाचा लोखंडी खांबांद्वारे उभारलेला मोठा मांडव ९ मे या दिवशी आलेल्या वादळी पावसात कोसळला; मात्र त्याला लागून असलेल्या आणि गवत अन् बांबू यांपासून बांधलेल्या यज्ञशाळेची कोणतीही हानी झाली नाही, अशी अनुभूती आल्याचे आश्रमाच्या दीदी श्री शिरेश्वरादेवी आणि पंडित राहुल शुक्ला यांनी दैनिक सनातन प्रभातच्या वार्ताहराला सांगितले.
या वेळी श्री शिरेश्वरादेवी आणि पंडित राहुल शुक्ला पुढे म्हणाले, वादळी पावसात मांडव पडल्यावर त्यात आमचे ३० ते ३५ लोक अडकून पडले होते. त्यांना आम्ही कसेबसे बाहेर काढले. त्यांच्यावर उपचार केले. (प्रत्यक्षात एकूण सिंहस्थामध्ये असे २०० हून अधिक मांडव पडले. त्यात शासनाच्या माहितीनुसार, १५ ते २० लोक घायाळ झाल्याची माहिती प्रसारीत करण्यात आली होती. प्रत्यक्षात आकडा किती मोठा असेल, हे या उदाहरणावरून लक्षात येते. तसेच शासनाला जनतेची किती काळजी आहे, हेही लक्षात येते. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) दुसर्या दिवशीही शासन, पोलीस वा स्थानिक प्रशासन आमच्या साहाय्यासाठी आले नाही. (भाजपच्या राज्यात हिंदूंना हे अपेक्षित नाही ! याला उत्तरदायी असलेल्यांवर शासन कोणती कारवाई करणार आहे, हेही जनतेला कळले पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) वादळ इतके तीव्र होते की, शासनाने बांधून दिलेल्या शौचालयाची दारे (सिमेंटचे पत्रे आणि लोखंडी चौकट) मोडून पडली; मात्र मांडवाच्या बाजूला असलेली गवत आणि बांबू यांपासून बांधलेली यज्ञशाळा तशीच आहे. तिची कोणतीही हानी झाली नाही. (अशा प्रकारे उज्जैनमध्ये सर्वच ठिकाणी मोठमोठे मांडव आणि कमानी पडल्या; मात्र यज्ञशाळांची हानी झाली नाही ! याविषयी अंनिसला काय म्हणायचे आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
या वेळी पौरोहित्य करणार्या दीदी शिरेश्वरादेवी म्हणाल्या, या मंडपाचा आकार चंद्रकोरीसारखा झाला आहे. मंडपाचा पुढचा भाग पडलेेला नाही; कारण त्या ठिकाणी आम्ही प्रतिदिन संतांना महाप्रसाद वाढायचो. त्यामुळे त्या भागाला काहीही झालेले नाही, तसेच व्यासपिठाजवळ शिवाची मूर्ती होती. त्या ठिकाणी मांडव पूर्णपणे पडलेला नाही. ईश्वरी शक्ती असणार्या ठिकाणी मांडवाला काहीही झालेले नाही. दुपारी ३ वाजता पाऊस आल्यानंतर ही सर्व पडझड झाल्यानंतरही आम्ही यज्ञशाळेत सायंकाळी ७ वाजताचा विधी पूर्ण केला. चांडाळ योगामुळे ही संकटे येत आहेत. ती दूर करण्यासाठी आम्ही धार्मिक विधी करत आहोत. जेणेकरून त्याची तीव्रता अल्प होईल. (स्वतःच्या मांडवाची हानी आणि अनेक लोक घायाळ झालेले असतांना समाजरक्षणासाठी असे प्रयत्न करणारेच हिंदु धर्माची खरी शक्ती होय ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात