चेन्नई (तमिळनाडू) – सालेम येथील श्री वेणुगोपाल कृष्णस्वामी मंदिराच्या भूमीवर झालेले अतिक्रमण हटवण्याचा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने तहसीलदारांना दिला. सालेममधील कन्ननकुरिची येथील ए राधाकृष्णन् यांनी मंदिराच्या मालमत्तेवरील अतिक्रमणाच्या विरोधात याचिका प्रविष्ट केली होती.
Madras HC directs Tahsildar to remove encroachments on temple land in Chennaihttps://t.co/gQ9Wp2W6Ud
— Express Chennai (@ie_chennai) August 10, 2022
या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने हा आदेश दिला. यासह तहसीलदारांना संबंधित भूमीचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल २ मासांत सादर करण्याचाही आदेश देण्यात आला.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात