नवी देहली – न्यूयॉर्कमध्ये १२ ऑगस्टच्या दिवशी सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या प्राणघातक आक्रमणानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. तथापि जगभरातील धर्मांध मुसलमान मात्र आक्रमणात रश्दी यांचा मृत्यू न झाल्यामुळे दु:खी आहेत. काही इस्लामी कट्टरतावाद्यांनी रश्दी यांच्यावरील आक्रमणावरून जल्लोष करायलाही आरंभ केला आहे.
१. ट्विटरवर प्रतिक्रिया व्यक्त करतांना धर्मांध मुसलमानांनी रश्दी यांच्यावरील आक्रमणाचे स्वागत केले आहे. काही जणांचे म्हणणे आहे की, असे भय असणे चांगले आहे.
२. अब्दुल माजिद नावाच्या एका व्यक्तीने लिहिले आहे की, ‘देर आए दुरुस्त आए.’
३. शाहिद नावाच्या व्यक्तीने म्हटले की, आधी तर हे लोक मुद्दामहून इस्लामच्या विरोधात बोलतात. इस्लामविषयी अपशब्द वापरतात आणि अल्लाहचा अवमान करतात. त्यानंतर त्यांच्या विरोधात काही घडले, तर पीडित असल्याचे नाटक करतात. अशा प्रकारे होणार्या हिंसेला खरेतर हेच लोक उत्तरदायी असतात. जर त्यांनी अशी चूक केलीच नसती, तर असे काही झालेच नसते.
४. इरफानुल्ला नावाची व्यक्ती म्हणाली की, अल्लाहची लाठी कोणत्याही आवाजाविना लागते.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात