Menu Close

केरळमधील शाळांमध्ये गुजरात दंगल आणि मोगल काळ यांविषयीचा अभ्यासक्रम पुन्हा शिकवण्याची शिफारस !

विद्यार्थ्यांना ‘गुजरात दंगली’विषयी माहिती देणाऱ्या केरळमधील साम्यवादी सरकारने याच दंगलीपूर्वी धर्मांध मुसलमानांनी हिंदूंना जाळून मारल्याच्या ‘गोध्रा घटने’विषयी माहिती दिली आहे का ? यावरून केरळ सरकारचा पराकोटीचा हिंदुद्वेष दिसून येतो ! केंद्र सरकारने अशी हिंदुद्वेषी शिकवण देणारे राज्य सरकार विसर्जित केले पाहिजे ! – संपादक  

गुजरात दंगल आणि मोगल काळ यांविषयीचा अभ्यासक्रम ‘एस्.सी.ई.आर्.टी.’ पुन्हा शिकवणार

थिरुवनंतपुरम् (केरळ) – केरळ सरकार राज्यातील शाळांमध्ये वर्ष २००२ मध्ये झालेली गुजरात दंगल आणि मोगल काळ यांविषयीचा अभ्यासक्रम पुन्हा शिकवण्याची शक्यता आहे. ‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’ने (‘एन्.सी.ई.आर्.टी.’ने) इयत्ता १२ वीच्या पाठ्यपुस्तकातून हा भाग वगळला होता, असे वृत्त ‘द हिंदु’ ने प्रसिद्ध केले आहे.

पिनाराई विजयन्, मुख्यमंत्री केरळ

‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा’च्या अनुषंगाने ‘एन्.सी.ई.आर्.टी.’ने इयत्ता ६ वी ते १२ वीपर्यंतच्या अभ्यासक्रमात तर्कशुद्ध पालट केले होते. यांतर्गत इयत्ता १२वीच्या राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकातील ‘भारतीय राजकारणातील अलीकडच्या घडामोडी’ या धड्यातील गुजरात दंगलीच्या संदर्भातील भाग, दंगलीच्या घटनेवरील राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अहवालातील उल्लेख, तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची ‘राजधर्म’विषयीची टिप्पणी, तसेच त्या दंगलीची वृत्तपत्रातील बातम्यांची छायाचित्रे, हे सर्व काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर त्यावर टीका झाली होती.

आता केरळ ‘राज्य काऊन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग’ने (‘एस्.सी.ई.आर्.टी.’ने) मात्र ‘हा भाग राज्यातील विद्यार्थ्यांसाठी कायम ठेवावा’, अशी शिफारस सामान्य शिक्षण विभागाकडे केली आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *