शिक्षणक्षेत्राच्या भगवेकरणाविषयी एवढी भीती बाळगण्याचे कारण काय ? बहुसंख्य हिंदूंच्या देशात शिक्षणाचे हिरवेकरण पवार यांना अपेक्षित आहे का ?
सातारा : शासकीय नीती पालटत चालली आहे. शिक्षणाला अर्थसाहाय्य करण्यासाठी शासनाचा हात आखडता व्हायला लागला आहे. यामुळे शिक्षणक्षेत्रात काम करणार्या घटकांवर याचा परिणाम दिसू लागला आहे. शासनाच्या पालटत्या धोरणांमुळे शिक्षणाचे भगवेकरण होते कि काय अशी, भीती शिक्षणतज्ञांना वाटू लागली आहे.
धर्मांध शक्तींच्या शिरकाव्यामुळे सद्यस्थितीतील शिक्षणक्षेत्रापुढे मोठी आव्हाने निर्माण झाली आहेत, असे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली. (राज्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांचे मोठमोठे घोटाळे उघडकीस येत आहेत. यामुळे राष्ट्रवादीची सत्ता असतांना त्यांनी नेमके काय काम केले, हाच प्रश्न आहे. त्यामुळे आताच्या शासनापुढे या घोटाळ्यांचेच मोठे आव्हान निर्माण झाले आहे. राजकारणाचे भ्रष्टाचारीकरण करणार्या अशा नेत्यांना जनतेनेच खडसवावे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ५७ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर, जिल्ह्यातील आमदार आणि खासदार उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात