Menu Close

महंमद आलम याने हिंदु विद्यार्थिनीला प्रेमात अडकवून तिच्यावर भावांसह केला सामूहिक बलात्कार

प्रयागराज – उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथे ‘लव्ह जिहाद’चे एक प्रकरण समोर आले आहे. महंमद आलम याने ‘अनुज’ हे हिंदु नाव धारण करून एका हिंदु विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि नंतर त्याच्या भावांसह तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडित मुलीच्या तक्रारीवरून कर्नलगंज पोलिसांनी महंमद आलम आणि त्याचे भाऊ यांच्याविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे.

१. ‘लव्ह जिहाद’चे हे प्रकरण प्रयागराज जिल्ह्यातील कर्नलगंज येथे घडले. महंमद आलम याने अनुज प्रताप सिंह असे नाव सांगून पीडित विद्यार्थिनीशी सोशल मीडियावरून मैत्री केली. तिच्याशी जवळीक साधण्यासाठी तो सर्व काही करत होता.

२. पीडित मुलगी आजारी पडली, तेव्हा तिला साहाय्य केल्याचे सांगितले जात आहे. यानंतर लग्नाच्या बहाण्याने त्याने तिला रामबाग येथील एका हॉटेलमध्ये नेले आणि तिच्याशी संबंध ठेवले. पुढे पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर त्याने तिचा गर्भपातही करून घेतला.

३. कालांतराने पीडित मुलीला अनुज हिंदु नसून मुसलमान असल्याचे समजले. तिने विरोध करणे चालू केल्यावर त्याने तिच्यावर धर्म परिवर्तन करण्यासाठी दबाव आणणे चालू केले. त्यानंतर त्याने एका खोलीस कोंडून आलम, त्याचा भाऊ असलम आणि नूर आलम यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

४. कशीतरी धर्मांधांच्या तावडीतून सुटून तिने पोलीस ठाणे गाठले आणि आरोपींच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली. याविषयीची माहिती मिळताच राष्ट्रीय हिंदु संघटनेचे जितेंद्र मिश्रा यांनी कार्यकर्त्यांसह पोलीस ठाणे गाठले आणि आरोपींच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *