Menu Close

नवे-पारगाव (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘महात्मा गांधी हॉस्पिटल’ येथे भारतीय स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा !

‘महात्मा गांधी हॉस्पिटल’ येथे भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवाप्रसंगी उपस्थित हॉस्पिटलचा कर्मचारी वर्ग

नवे-पारगाव (जिल्हा कोल्हापूर), १७ ऑगस्ट (वार्ता.) – भारतीय स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव ‘महात्मा गांधी हॉस्पिटल’ येथे उत्साहात साजरा करण्यात आला. ‘महात्मा गांधी मेडिकल चॅरिटेबल ट्रस्ट’च्या व्यवस्थापकीय प्रतिनिधी डॉ. (श्रीमती) शिल्पा कोठावळे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.

‘महात्मा गांधी हॉस्पिटल’ येथे भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवाप्रसंगी डावीकडून डॉ. कौशल कोठावळे, श्री. राजन मुखरे, प्राचार्य हरीष कुलकर्णी, सद्गुरु स्वाती खाडये, डॉ. (श्रीमती) शिल्पा कोठावळे, पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे, श्री. रमेश शिंदे आणि श्री. मनोज खाडये. या वेळी डॉ. (श्रीमती) शिल्पा कोठावळे यांच्या हस्ते ध्वजारोहरण करण्यात आले.

या प्रसंगी सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, सनातनच्या पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, तसेच गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये, ‘तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालया’चे प्राचार्य डॉ. हरिश कुलकर्णी, ‘महात्मा गांधी हॉस्पिटल’चे प्रशासकीय अधिकारी श्री. सुधीर राऊत, श्री. राजन मुखरे यांच्यासह हॉस्पिटलचे कर्मचारी आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

‘महात्मा गांधी हॉस्पिटल’ येथे भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवाप्रसंगी मार्गदर्शन करतांना श्री. रमेश शिंदे, तसेच मान्यवर

भावी पिढीला ‘स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलीदान केलेले आहे’, हे समजावून सांगावे लागेल ! – रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

‘‘भारताला सहज स्वातंत्र्य मिळालेले नाही. ते मिळवून देण्यात क्रांतीकारकांचे विशेष योगदान आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, मदनलाल धिंग्रा यांनी विदेशात जाऊन भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी योगदान दिले. याउलट आज काही लोक भारतात सर्व सुविधा असून भारतात शिक्षण घेऊन भारतासाठी काही योगदान न देता विदेशात चाकरी करतात. त्यामुळे आपल्याला भावी पिढीला ‘स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलीदान दिलेले आहे’, हे समजावून सांगावे लागेल.’’

‘महात्मा गांधी हॉस्पिटल’ येथे भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवाप्रसंगी उपस्थित हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन आणि संतांची उपस्थिती हा दुग्धशर्करायोग ! – प्राचार्य डॉ. हरीश कुलकर्णी

‘‘सद्गुरु आणि संत यांची उपस्थिती असल्याने आजचा स्वातंत्र्यदिन आपल्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे. संतांचे आशीर्वाद आपले महाविद्यालय, रुग्णालय यांना मिळणार आहेत. त्यामुळे अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन आणि संतांची उपस्थिती, हा आज दुग्धशर्करायोग आहे.’’

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *