-
वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन
-
हिंदूबहुल भारतात जिहादी संघटनेकडून हिंदूंच्या हत्या होत असतांना तिच्यावर सरकार बंदी कधी घालणार ?
-
विविध राज्यांतील विद्यालयांचे इस्लामीकरण थांबवा !
वाराणसी (उत्तरप्रदेश) – ‘सर तन से जुदा’ या षड्यंत्राचा शोध घेऊन अशा हत्यांमध्ये सहभागी असलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.)’सारख्या इस्लामी संघटनांवर तात्काळ बंदी घालण्यात यावी, तसेच विद्यालयांचे इस्लामीकरण करणारे प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचे वेतन थांबवण्यात यावे, या मागण्यांसाठी जिल्हाधिकार्यांच्या मार्फत केंद्रीय गृहमंत्री अन् केंद्रीय शिक्षणमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. याप्रसंगी अधिवक्ता संजीवन यादव, अधिवक्ता अरुण मौर्य, अधिवक्ता मदन मोहन यादव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन केसरी, सनातन संस्थेचे श्री. प्रमोद गुप्ता, श्री. रितेश गुप्ता आदी उपस्थित होते.
‘सर तन से जुदा’ची घोषणा देऊन संपूर्ण देशात एका मागोमाग एक हिंदूंच्या निवडून हत्या केल्या जात आहेत, कानपूरच्या ‘फ्लोरेट्स इंटरनॅशनल स्कूल’मध्ये हिंदु विद्यार्थ्यांना कलमा (इस्लामी प्रार्थना) शिकवण्यात येत आहेत, तसेच झारखंड, बंगाल, बिहार आदी अनेक राज्यांमध्ये शाळांमध्ये सरकारी निर्णयानुसार रविवारऐवजी शुक्रवारी सुटी देण्यात येत आहे आणि हिंदीच्या ठिकाणी उर्दू भाषेचा वापर करण्यात येत आहे. नुकतेच झारखंडमधील भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेत सांगितले की, अनुमाने १ सहस्र ८०० विद्यालयांमध्ये रविवारऐवजी शुक्रवारी सुटी देऊन देशाचे इस्लामीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणांची सखोल चौकशी करून कारवाई करावी.
अन्य मागण्या…
१. रविवारऐवजी शुक्रवारी सुटी देणार्या राज्यांमध्ये केंद्रीय अन्वेषण पथक पाठवून व्यापक स्तरावर चौकशी करण्यात यावी.
२. ‘सर तन से जुदा’ या षड्यंत्रात सहभागी लोकांवर ‘बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा (यूएपीए)’ अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात यावेत.
३. जिहाद्यांपासून धोका असलेल्या हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना संरक्षण देण्यात यावे.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात