Menu Close

ही मुसलमानांच्या बापाची जागा नाही; शांततेत रहा अन्यथा पाकमध्ये चालते व्हा – ईश्‍वरप्पा यांची चेतावणी

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या फलकाला विरोध केल्याच्या प्रकरणी कर्नाटकातील भाजपचे आमदार आणि माजी मंत्री ईश्‍वरप्पा यांची चेतावणी

काँग्रेसला येथे ‘जय पाकिस्तान’ किंवा ‘जय इस्लामीस्तान’ लिहिले असते, तर चुकीचे वाटले नसते, हे लक्षात घ्या ! -संपादक

भाजपचे आमदार आणि माजी मंत्री ईश्‍वरप्पा

शिवमोग्गा (कर्नाटक) – येथे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ठिकठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र असणारे फ्लेक्स फलक लावण्यात आले होते. त्याला स्थानिक मुसलमानांनी विरोध करत तेथे टिपू सुलतान आणि महंमद अली जिना यांचे चित्र लावण्याचा प्रयत्न केला. त्यावरून येथे वाद होऊन धर्मांधांनी दोन हिंदूंवर प्राणघातक आक्रमणही केले. या प्रकरणी प्रसारमाध्यमांशी बोलतांना भाजपचे स्थानिक आमदार आणि माजी मंत्री ईश्‍वरप्पा यांनी चेतावणी दिली आहे. ते म्हणाले की, आम्हाला वाटेल तेथे आम्ही फलक लावू. ही जागा काही मुसलमानांच्या बापाची नाही. जर शांततेत रहायचे असेल, तर रहा आणि जे देशविरोधी आहेत त्यांनी पाकिस्तानात चालते व्हा.

ईश्‍वरप्पा पुढे म्हणाले की, सध्या येथील स्थिती नियंत्रणात आहे; मात्र या हिंसाचाराला येथील काँग्रेसचे नगरसेवक उत्तरदायी आहेत. ‘काँग्रेस राष्ट्रद्रोह्यांचे समर्थन करत आहे’, असे मी थेट सांगू शकतो. हा हिंसाचार, म्हणजे १०० टक्के षड्यंत्र होते. विशेष म्हणजे २४ घंट्यांत आरोपीला अटक करण्यात आली.

उडुपी येथे फलकावर ‘जय हिंदु राष्ट्र’ लिहिल्याने काँग्रेसचा विरोध

उडुपी येथील ब्रह्मगिरी चौकात स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या लावण्यात आलेल्या फ्लेक्स फलकावर ‘जय हिंदु राष्ट्र’ असे लिहिण्यात आले आहे. त्याला काँग्रेसने विरोध केला आहे. ‘जर हा फलक काढला नाही, तर मोठे आंदोलन करू’, अशी चेतावणी काँग्रेसने दिली आहे. काँग्रेसचा आरोप आहे की, हा फलक विनाअनुमती लावण्यात आला आहे. प्रत्यक्षात या फलकासाठी १८ ऑगस्टपर्यंत महानगरपालिकेकडून रितसर अनुमती घेण्यात आली आहे. (खोटारडी काँग्रेस ! – संपादक)

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *