पोलिसांकडून गुन्हा नोंदवून घेण्यास नकार
बांगलादेशातील असुरक्षित हिंदू ! एकीकडे बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना ‘हिंदूंनी स्वतःला अल्पसंख्यांक समजू नये’ असे म्हणतात; मात्र दुसरीकडे त्यांचे मात्र रक्षण करत नाहीत, असे भारताने हसीना यांना खडसवायला हवे ! – संपादक
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात हिंदु मुलीची छेड काढणार्या धर्मांधांना विरोध करणार्या तिच्या वडिलांवर धर्मांधांनी प्राणघातक आक्रमण केले. नील माधव साहा असे त्यांचे नाव आहे. त्यांची मुलगी शिकवणीला जात असतांना राजशाही रेल्वे स्थानकाजवळील रस्त्यावर मिराज उपाख्य इम्रान आणि प्रिंस या दोघांनी तिची छेड काढली. यापूर्वीही या दोघांनी तिची छेड काढली होती. छेडछाडीनंतर इम्रान आणि प्रिंस मुलीच्या घरी गेले आणि नील माधव साहा यांच्याशी वाद घालू लागले. त्यानंतर त्यांनी साहा यांच्यावर चाकूद्वारे प्राणघातक आक्रमण केले, तसेच हातोड्याद्वारे त्यांच्या डोक्यावर घाव घातला. या वेळी मामून, फराद, रेहम, अखेर आणि रॉबिन हे आरोपीही उपस्थित होते.
आक्रमणाच्या वेळी आरोपींनी साहा यांच्याकडून ३०० रुपये आणि त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरून नेली. या घटनेनंतर साहा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास गेले असता पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही. त्यांना रुग्णालयात भरती केले. उपचारांनंतर साहा पुन्हा पोलीस ठाण्यात गेल्यावर पोलिसांनी त्यांना ही घटना रेल्वे पोलिसांच्या सीमेमध्ये झाल्याचे सांगत गुन्हा नोंदवण्यास नकार दिला. रेल्वे पोलिसांनीही गुन्हा नोंदवण्यास नकार दिला. नंतर वर्तमानपत्रांमध्ये या घटनेचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंदवला आणि तिघांना अटक केली.
आम्हाला मरावे लागेल, आत्महत्या करावी लागेल किंवा भारतात पळून जावे लागेल ! – पीडितेच्या वडिलांची व्यथाहिंदूंवरील या अन्यायाकडे आंतरराष्ट्रीय मानवाविधकार संघटनांना लक्ष द्यायला तरी भारताने सांगायला हवे ! याविषयी साहा यांनी सांगितले की, प्रिंस याने धमकी दिली की, येथे जिवंत रहायचे असेल, तर मी त्यांना प्रतिमहा पैसे दिले पाहिजे आणि मुलीचा विवाह त्याच्याशी लावून दिला पाहिजे. आम्ही येथे अल्पसंख्यांक आहोत, त्यामुळे आम्हाला अशा घटनांना सामोरे जावे लागते. आम्हाला मरावे लागेल, आत्महत्या करावी लागेल किंवा भारतात पळून जावे लागेल. आमच्या साहाय्यासाठी कुणीही पुढे आलेला नाही. आम्हाला न्याय हवा आहे. |
स्रोत: दैनिक सनातन प्रभात