Menu Close

हिंदु सणांच्या वेळी प्रदूषणविरोधी कायद्याचा अपवापर करणार्‍या ‘प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या संबंधित अधिकार्‍यांना निलंबित करा !

  • ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’कडे हिंदु जनजागृती समितीची निवेदनाद्वारे मागणी

  • महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अंतर्गत असलेल्या हवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक डॉ. वि. मो. मोटघरे यांचे लिखित स्वरूपात उत्तर देण्याचे आश्‍वासन

  • हिंदूंना अशी मागणी का करावी लागते ? ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या हे लक्षात येत नाही का ?
  • अवास्तवादी विचार मांडणार्‍या अधिवक्त्या नित्रा चाफेकर ! भारतात हिंदूंची संख्या अधिक म्हणून हिंदूंसाठी अधिक योजना राबवल्या जातात का ? तेथे सरकारी यंत्रणा हा नियम का राबवत नाही ? स्वतःची चूक झाकण्यासाठी असे अतार्किक विधाने करणार्‍या अधिकार्‍यांना हिंदू ओळखून आहेत ! -संपादक 
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अंतर्गत असलेल्या हवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक डॉ. वि. मो. मोटघरे यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. अभिषेक मुरुकटे (१.) आणि श्री. रोहिदास शेडगे (२.)

मुंबई – केवळ हिंदु सणांच्या वेळी प्रदूषणविरोधी कायद्याचा अपवापर करून हिंदूंशी पक्षपात करणार्‍या प्रदूषण मंडळाच्या संबंधित अधिकार्‍यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अंतर्गत असलेल्या हवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक डॉ. वि. मो. मोटघरे यांची शीव (मुंबई) येथील कार्यालयात भेट घेऊन समितीचे श्री. अभिषेक मुरुकटे आणि श्री. रोहिदास शेडगे यांनी निवेदन देत ही मागणी केली. निवेदन स्वीकारल्यावर डॉ. मोटघरे यांनी ‘आम्ही निवेदनाचा सविस्तर विचार करून येत्या १५ दिवसांमध्ये लिखित स्वरूपात उत्तर देऊ’, असे आश्‍वासन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की,…

१. वर्षातील ३६५ दिवस मशिदींवरून भोंग्याद्वारे प्रचंड ध्वनीप्रदूषण केले जाते. दिवाळीच्या कालावधीत जसे ध्वनीप्रदूषणाचे सर्वेक्षण करण्यात येते, त्याच प्रमाणे बकरी ईद, मोहरम आणि अन्य धर्मीय वा पंथीय यांच्या सण-उत्सवांच्या वेळी होणार्‍या प्रदूषणाविषयी अभ्यासपूर्ण अहवाल मंडळाने सिद्ध करावेत. ते प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावेत.

२. वर्ष २०१५ ते २०२१ या ७ वर्षांच्या कालावधीत ध्वनीप्रदूषणाविषयी ‘महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळा’ने हिंदूंच्या दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांवर २३० खटले प्रविष्ट केले आहेत, तर मुसलमानांवर केवळ २२ खटले प्रविष्ट आहेत, असे माहिती अधिकारातून उघड झाले आहे.

या उदाहरणासह अनेक उदाहरणे निवेदनात दिली आहेत. त्यातून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रदूषणविरोधी कायद्याचा वापर पक्षपातीपणे हिंदूंच्या विरोधातच कसा प्रकारे करत आहे, हे स्पष्ट होत आहे.

विधी अधिकारी अधिवक्त्या नित्रा चाफेकर यांचे विधान

(म्हणे) ‘हिंदूंचे सण अधिक प्रमाणात असल्याने हिंदूंवर अधिक कारवाई झाली !’

हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाकडून श्री. अभिषेक मुरुकटे आणि श्री. रोहिदास शेडगे यांची हवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक डॉ. वि. मो. मोटघरे यांच्या समवेत प्रदूषण मंडळाच्या कारवाईविषयी या वेळी चर्चा झाली. या वेळी विधी अधिकारी अधिवक्त्या श्रीमती नित्रा चाफेकर, उपप्रादेशिक अधिकारी श्री. जे.एस्. हजारे तसेच शीव पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री. सचिन बोराडेही उपस्थित होते.

१. हिंदु सणांवर मोठ्या संख्येने कारवाई करून गुन्हे नोंद केले आहेत, हे समितीच्या प्रतिनिधींनी सांगितल्यावर ‘आमच्याकडे जेव्हा तक्रारी येतात, तेव्हाच आम्ही कारवाई करतो’, असे डॉ. मोटघरे म्हणाले.

२. ‘प्रदूषण मंडळ हिंदूंच्या सणांच्या वेळी ध्वनीमापन यंत्र घेऊन आवाजाचा डेसिबल आणि ध्वनीप्रदूषण किती झाले, ते मोजते. याविषयी मंडळाच्या संकेतस्थळावर आकडेवारीसह दिले आहे; मात्र मशिदीतून वाजणारे अनधिकृत भोंगे हे ३६५ दिवस वाजत असतात, त्या वेळी त्यांच्यावर कारवाई का होत नाही ? मग कुठेतरी आम्हाला असा दुजाभाव वाटतो की, केवळ हिंदूंनाच लक्ष्य केले जाते कि काय ?’, असे समितीच्या प्रतिनिधींनी सांगितल्यावर अधिवक्त्या श्रीमती नित्रा चाफेकर म्हणाल्या, ‘‘आम्ही धार्मिक पक्षपात करत नाही. आमच्याकडे पोलीस ठाण्यांतून आलेल्या तक्रारीनंतरच आम्ही कारवाई करतो. हिंदूंवर अधिक कारवाई झाली आहे; कारण हिंदूंचे सण अधिक प्रमाणात आहेत.’’ ‘सकाळी ५ वाजता ध्वनीक्षेपक न लावण्याचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाचा असून त्याचे पालन न करणे हे परस्पर माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघनच आहे’, असेही त्या नंतर म्हणाल्या.

मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याची चेतावणी

‘निवेदनातील मागण्या मान्य न झाल्यास राज्यातील सार्वजनिक उत्सव मंडळे, हिंदु संघटना मिळून रस्त्यावर उतरून राज्यव्यापी आंदोलन छेडतील’, असे शेवटी समितीच्या प्रतिनिधींनी सूचित केले.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *