संभाजीनगर : स्वसंरक्षण प्रशिक्षण स्वतः घेऊन धर्माभिमानी म्हणून सिद्ध होण्याच्या उद्देशाने येथील आडगावखुर्द येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एक दिवसीय स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर ८ मे या दिवशी श्री राधाकृष्ण मंदिराच्या प्रांगणात आयोजित केले होते. या शिबिराला आडगावखुर्द आणि आसपासच्या परिसरातील २२ धर्माभिमानी सहभागी झाले होते.
या शिबिराची सुरुवात भगवान श्रीकृष्णाच्या श्लोकाने करण्यात आली. त्यानंतर समितीचे पुणे येथील कार्यकर्ते श्री. विजय चौधरी यांनी शिबिराचा उद्देश सांगितला. सदर शिबिरामध्ये उपस्थित धर्माभिमान्यांना काही व्यायाम प्रकार आणि कराटेचे काही प्रकार शिकवण्यात आले. या वेळी प्रशिक्षण वर्गाचे स्वरूप कसे असावे आणि त्याची आवश्यकता काय, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित धर्माभिमान्यांचा नेतृत्व गुण वाढवण्याच्या उद्देशाने काही प्रायोगिक भाग घेण्यात आले.
क्षणचित्रे
१. या शिबिरानंतर अनेक तरुणांनी स्वतः प्रशिक्षण वर्ग घेण्याची सिद्धता दर्शवली. त्याचाच एक भाग म्हणून दर रविवारी सकाळी नियमित प्रशिक्षण वर्ग घेण्याचे ठरवण्यात आले.
२. शिबिरासाठी आलेले धर्माभिमानी आणि समितीचे कार्यकर्ते यांच्या भोजनाची व्यवस्था आडगावखुर्द मधील धर्माभिमान्यांनी केली होती.