Menu Close

केरळमध्ये आता रामायण मासच्या धर्तीवर बायबल वाचन मास होणार !

हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठीच कावेबाज ख्रिस्त्यांचे हे षड्यंत्र नाही कशावरून ? स्वत:ची फसवणूक होऊ नये, यासाठी हिंदूंनी सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे !

कोची – गरीब आणि अज्ञानी हिंदूंना फसवून ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करण्यासाठी ख्रिस्ती मिशनरी सतत हिंदु धर्मातील चालीरिती, धर्मग्रंथ आदींची नक्कल करत असतात. कार्तिक मासांत केरळ राज्यातील हिंदु रामायणाचे पारायण करून रामायण मास पाळतात. त्याच धर्तीवर बायबल कमिशन या केरळ राज्यातील संस्थेने डिसेंबर मासात बायबल वाचन मास पाळण्याचे ठरवले आहे. याविषयी माहिती देतांना फादर व्हर्गीस वालीकत्तू म्हणाले, केरळ कॅथॉलिक बिशप कौन्सिलच्या वतीने हा उपक्रम या वर्षीपासून हाती घेण्यात आला आहे. डिसेंबरमध्ये येशू ख्रिस्ताचा जन्म झाला म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. हा कार्यक्रम रामायण मासच्या धर्तीवर आयोजित करण्यात आला आहे का ? असे त्यांना विचारले असता त्यांनी होकार दिला.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *