लातूर : लातूर शहरात अनेक पुरातन, ऐतिहासिक आणि विक्रमी विहिरी आहेत. यंदाच्या दुष्काळात या विहीरी कामाला आल्या असत्या. फक्त गाळ काढण्याची गरज होती पण दुर्दैवाने हे होऊ शकले नाही.
सुकाणू समितीने दिलेल्या विहीरींच्या यादीतील केवळ गोरक्षणच्या विहिरीचा गाळ काढण्यात आला. बाकी विहीरी तशाच आहेत. गोरक्षणच्या विहीरीतला गाळ काढल्यानंतर उत्तम पाणी आले पण केवळ मोटार नसल्याने हे पाणी फक्त पाहण्याशिवाय पर्याय नाही.
अशीच एक उत्तम बांधलेली विहीर सार्वजनिक बांधकाम कार्यालयाच्या पाठीमागे आहे. या विहीरीत फक्त गणपती मूर्त्या आहेत. विसर्जन होऊन बराच काळ लोटला पण या मूर्त्या अजून तशाच आहेत. मूर्त्यांनी पाणी तर अडवलेच शिवाय देवतांचा अवमान या भागातील जनता रोजच पहात आहे.
या प्रकरणी आज लातूरने अनेकदा आवाज उठवला पण सार्वजनिक बांधकाम विभाग काय किंवा मनपा काय दोघांनाही जाग आली नाही. या भागात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी राहतात. त्यांना या प्रकाराचे कसलेही सोयरसुतक नाही. मिडीयाने आवाज उठवावा अशी अपेक्षा इथले रहिवासी व्यक्त करतात. पण ते एकत्र येत नाहीत. तक्रार करीत नाहीत. जे काही करायचे ते माध्यमांनी करावे असे मजबूतपणे सांगतात.
संदर्भ : आज लातुर