-
देहली विमानतळावरील शौचालयांबाहेरील छायाचित्रांद्वारे लव्ह जिहादला उत्तेजन !
-
‘इस्कॉन’चे प्रवक्ते राधारमण दास यांचा आक्षेप !
नवी देहली – देहलीतील विमानतळावरील शौचालयांच्या बाहेर पुरुष आणि महिला शौचालये दर्शवण्यासाठी एका पुरुषाचे अन् महिलेचे छायाचित्र लावण्यात आले आहे. यात पुरुषाचे छायाचित्र हे गोल टोपी घातलेल्या मुसलमान तरुणाचे, तर महिलेचे छायाचित्र एका हिंदु तरुणीचे आहे.
These are the Toilet's at Delhi Airport. Just see how powerful is their propaganda machine. For so called communal harmony can @AAI_Official put a Hindu man with tilak & image of a women in burqa or only love jihad propaganda is allowed? @JM_Scindia pic.twitter.com/NKQEclqMsG
— Radharamn Das राधारमण दास (@RadharamnDas) August 21, 2022
यावर ‘इस्कॉन’चे प्रवक्ते राधारमण दास यांनी आक्षेप घेत ट्वीट करून यास विरोध दर्शवला आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘पहा त्यांची प्रचार यंत्रणा किती शक्तीशाली आहे. तथाकथित धार्मिक सौहार्दासाठी काय केले आहे ? ही जिहादच्या प्रचाराची अनुमती आहे का ?’, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी याविषयी केंद्रीय नागरी विमान मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना ट्वीट द्वारे कळवले आहे.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात