लाहोर (पाकिस्तान) – पाकिस्तानातील अत्याचारांमुळे तेथील हिंदू भारतात येत असतात; मात्र जुलै २०२२ पर्यंत येथे आलेल्या हिंदूंपैकी ३३४ हिंदू निर्वासित पुन्हा पाकिस्तानात परतले असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. वर्ष २०२१ पासून आतापर्यंत अनुमाने १ सहस्र ५०० पाकिस्तानी हिंदू पाकमध्ये परतले आहेत. ‘यांपैकी बहुतेक हिंदूंकडे भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी आवश्यक असलेली औपचारिकता पूर्ण करण्यासाठी पैसा किंवा कागदपत्रे नसल्यामुळे पाकिस्तानला परत जात आहेत’, असे हिंदू सिंग सोढा यांनी सांगितले.
नहीं मिली भारत की नागरिकता, 18 महीने में 1500 पाकिस्तानी हिंदू वापस लौटे
https://t.co/sQ3wvpph3h— Jansatta (@Jansatta) August 22, 2022
१. सध्या पाकमधील २५ सहस्र हिंदू हे भारतीय नागरिकत्व स्वीकारण्यासाठी इच्छुक आहेत. मागच्या १० ते १५ वर्षापासून हे हिंदू भारतात रहात असून त्यांना भारतीय नागरिकत्व मिळण्याची निश्चिती नसल्यामुळे त्यांतील राजस्थानातील जैसलमेर येथून वर्ष २०२१ मध्ये १ सहस्र ५०० पाकिस्तानी हिंदू पाकिस्तानात परतले होते.
२. हिंदू सिंग सोढा यांनी सांगितले की, वर्ष २००४ आणि २००५ मध्ये नागरिकत्व देण्यासाठी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. त्यांमध्ये अनुमाने १३ सहस्र पाकिस्तानी हिंदूंना भारतीय नागरिकत्व मिळाले; परंतु गेल्या ५ वर्षांत केवळ २ सहस्र पाकिस्तानी हिंदूंना नागरिकत्व देण्यात आले.
३. भारतच्या गृह मंत्रालयाच्या नियमानुसार नागरिकत्वासाठी अर्ज करण्यासाठी पाकिस्तानी स्थलांतरितांच्या पारपत्राचे नूतनीकरण करावे लागते आणि पारपत्र लागू होण्यासाठी पाकिस्तानी दूतावासाकडून प्रमाणपत्रदेखील सादर करावे लागते. त्यामुळे याच्यासाठी फार खर्च करावा लागतो. हा खर्च करूनही भारताचे नागरिकत्व मिळण्याची शाश्वती नसल्यामुळे पाकिस्तानी हिंदू पुन्हा पाकमध्ये परतात.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात