जम्मू-काश्मीरमध्ये २० गायींना वधापासून मुक्ती देणार्या गौपुत्र सेनेचे अभिनंदन !
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये गोरक्षणासाठी कार्यरत गौपुत्र सेनेचे प्रदेशाध्यक्ष श्री. खेमराज यांच्या नेतृत्वाखाली गौपुत्र सैनिकांनी अरनिया भागात धाड टाकून गोतस्करांना जोरदार चोप दिला आणि २० गायींची सुटका केली. त्यानंतर गोरक्षकांनी आरोपींना पोलिसांच्या स्वाधीन केले. सुटका करण्यात आलेल्या गायींना स्थानिक गोशाळा आणि शेतकरी यांच्याकडे सोपवण्यात आले.
या गायी गोतस्करांनी मले दे कोठे या गावात कापण्याच्या उद्देशाने बांधून ठेवल्या होत्या. (मुसलमानबहुल भाग असूनही गोरक्षणाचे कार्य धैर्याने करणार्या गोपुत्र सेनेच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! इतरांनी यातून बोध घ्यावा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात