Menu Close

एकतर्फी प्रेमातून मुसलमान तरुणाचा हिंदु मुलीला जाळून मारण्याचा प्रयत्न

झारखंडमध्ये लव्ह जिहादचे प्रकरण उघड

देशात प्रतिदिन लव्ह जिहादच्या घटना घडत असतांनाही त्या रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा काहीही न करता हतबलतेने पहात बसतात, हे लक्षात घ्या ! हिंदु स्त्रियांच्या रक्षणासाठी हिंदूंनी आता तरी संघटित होऊन आवाज उठवला पाहिजे ! – संपादक 

रांची (झारखंड) – झारखंडच्या दुमका जिल्ह्यात एकतर्फी प्रेमातून शाहरूख हुसेन नावाच्या मुसलमान तरुणाने हिंदु मुलीला पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची घटना नुकतीच घडली. याआधी त्याने पीडितेला जिवे मारण्याची धमकी दिली होती. पीडित मुलीला फुलो झानो वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. मुलीचे शरीर ९० टक्के भाजले आहे, असे तेथील डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी तात्काळ कारवाई करत पोलिसांनी आरोपी शाहरुख हुसेनला अटक केली आहे.

प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार शाहरूख हुसेन नावाचा बांधकाम कामगार त्याच्या शेजारी रहाणार्‍या हिंदु मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता. तो पीडित मुलीला जाता-येता त्रास द्यायचा. त्याने कुठून तरी तिचा भ्रमणभाष क्रमांक मिळवला. भ्रमणभाषवरून तो तिला धमकावत होता आणि तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत होता. २३ ऑगस्टला पहाटे पीडित हिंदु मुलगी तिच्या घरी झोपली होती. तेव्हा शाहरूख हुसेन तिच्या घरी आला आणि त्याने खिडकीतून पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले. घाबरून तिने वडिलांच्या खोलीत धाव घेतली. कुटुंबियांनी आग विझवली आणि तिला रुग्णालयात भरती केले.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *