Menu Close

बांगलादेशमध्ये धर्मांधांनी हिंदूंची ८ घरे जाळली; दुकानांचीही तोडफोड

बांगलादेशमध्ये हिंदू असुरक्षित !

किशोरगंज (बांगलादेश) – बांगलादेशातील किशोरगंज जिल्ह्यातील भैरब चंडीब गावात धर्मांधांनी रात्रीच्या अंधारात हिंदूंच्या घरांवर आक्रमण केले. या आक्रमणात हिंदूंची ८ घरे जाळण्यात आली. तेथील काही दुकानांचीही तोडफोड करण्यात आली. हिंदूंची घरे जळून खाक झाल्याने पीडित हिंदु कुटुंबे निराधार झाली आहेत, तसेच नरसिंगडी जिल्ह्यातील पलाश उपजिल्ह्यामध्ये हिंदु व्यापार्‍यांच्या ४ दुकानांना धर्मांधांनी आग लावली. येथील हिंदू सध्या भीतीच्या सावटाखाली जगत आहेत, अशी माहिती ‘द व्हॉइस ऑफ बांगलादेशी हिंदू’ने दिली आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *