Menu Close

नितीश कुमार यांना अर्जुनाच्या, तर शरद यादव यांना कृष्णाच्या रूपात रेखाटले !

संयुक्त जनता दलाकडून फलकाद्वारे श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा अवमान ! 
हिंदूंनो, सातत्याने होणार्‍या देवतांच्या विडंबनाच्या विरोधात कठोर कायदा करण्यासाठी केंद्रशासनावर दबाव निर्माण करा ! हिंदूंनो, अशा पक्षांना निवडणुकीत धडा शिकवा !

nitish_kumar_sharad_yadav_vidamban

वाराणसी : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार उत्तरप्रदेशात वाराणसीच्या दौर्‍यावर येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी फलक लावण्यात आला आहे.

या फलकावर कृष्णार्जुनाचे रथातील चित्र रेखाटण्यात आले आहे. त्यात नितीशकुमार यांना अर्जुनाच्या रूपात, तर संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव यांना कृष्णाच्या रूपात दाखवण्यात आले आहे.

या फलकाद्वारे केंद्रशासन आणि उत्तरप्रदेश शासन यांच्यावर टीकाही करण्यात आली आहे. या दोघांच्या विरोधात युद्धाची घोषणा करण्याचेही आवाहन यात करण्यात आले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *