Menu Close

सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांसमवेत झालेल्या बैठकीस उत्स्फूर्त प्रतिसाद !

गावभाग येथील गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना हिंदु जनजागृती समितीच्या श्रीमती मधुरा तोफखाने
ईश्वरपूर येथील गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत सहभागी विविध गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते

सांगली, २७ ऑगस्ट (वार्ता.) – गणेशोत्सवाच्या निमित्ताने सांगली जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने ठिकठिकाणी गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांसमवेत झालेल्या बैठकीत मंडळांच्या कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या सर्वांनी गणेशोत्सवात धर्मप्रसार करण्याचा निर्धार व्यक्त केला.

१. सांगली शहरातील गावभाग येथील हरिदास भवन येथे झालेल्या बैठकीत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आम्हीही स्वाक्षरी करून निवेदन प्रशासनास देऊ, असे सांगितले. काही मंडळांनी आरती, तसेच अन्य धार्मिक कृती धर्मशास्त्रानुसार करू, असे सांगितले.

२. शिवसेनेचे वाळवा तालुकाप्रमुख श्री. गजानन पाटील आणि अन्य ६ गणेशोत्सव मंडळे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत सर्वांनी गणेशोत्सव धर्मशास्त्रानुसार साजरा करण्याचे ठरवले.

३. ईश्वरपूर येथे झालेल्या बैठकीत एका मंडळाने १०० सनातननिर्मित अथर्वशीर्ष ग्रंथांची मागणी केली. एका मंडळाने गणेशोत्सव कालावधीत मद्य आणि मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्यास प्रशासनास निवेदन देऊ, असे सांगितले.

गावभाग, सांगली येथील मयूर कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ यांनी लिहिलेला फलक
कसबे डिग्रज येथील सरपंच सौ. किरण लोंढे यांना (उजवीकडे) निवेदन देतांना श्रीमती मधुरा तोफखाने आणि सौ. सुलभा तांबडे
तासगाव येथे तहसीलदार रवींद्र राजंणे यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ
शिरोळ (जिल्हा कोल्हापूर) येथे तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ (उजवीकडे) यांना निवेदन देतांना धर्मप्रेमी मंदार पाटुकले आणि श्री. विनय चव्हाण (डावीकडे)

अन्य घडामोडी

१. ठिकठिकाणी फलक प्रसिद्धीद्वारे धर्मशिक्षणाचा मजकूर ठिकठिकाणी पोचवण्यात येत आहे.

२. कसबे डिग्रज येथील सरपंच सौ. किरण लोंढे यांना निवेदन दिल्यावर त्यांनी ग्रामस्थांची बैठक बोलावून त्यांना विषय सांगण्याचे आश्वास दिले.

३. तासगाव येथे तहसीलदार रवींद्र रांजणे, पोलीस ठाण्यात साहाय्यक पोलीस निरीक्षक काळगावे यांना, तर नगर परिषद मुख्याधिकारी पृथ्वीराज अरुण माने-पाटील यांना निवेदन देण्यात आले.

४. शिरोळ येथे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांना, तसेच शिरोळ (जिल्हा कोल्हापूर) येथे तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी धर्मप्रेमी मंदार पाटुकले आणि श्री. विनय चव्हाण उपस्थित होते.

हिंदु जनजागृती समितीने गणेशोत्सवाच्या संदर्भात दिलेल्या निवेदनाची जिल्हा प्रशासनाकडून नोंद !

हिंदु जनजागृती समितीने गणेशोत्सवाच्या संदर्भात जिल्हा प्रशासनास दिलेल्या निवेदनाची नोंद घेत सर्व नगरपालिका, नगर परिषद, तसेच महाराष्ट्र प्रदूषण मंडळ यांना पाठवलेले पत्र

सांगली – गणेशोत्सवातील तथाकथित प्रदूषणाचे कारण सांगून ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘श्री गणेशमूर्तीदान’ या धर्मबाह्य संकल्पना राबवून श्री गणेशमूर्तींची घोर विटंबना तातडीने थांबवावी या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीने जिल्हा प्रशासनास निवेदन दिले होते. याची नोंद घेत ‘या निवेदनावर योग्य ती कार्यवाही करावी’, असे पत्र जिल्हा प्रशासनाने सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका, सर्व नगरपालिका, नगर परिषद, तसेच महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी यांना पाठवले आहे. या पत्रासोबत हिंदु जनजागृती समितीने दिलेल्या पत्राची प्रत जोडण्यात आली आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *