Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीच्या निमित्ताने आजपासून ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’चे आयोजन !

हिंदु जनजागृती समिती हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उद्देशाने गेली २० वर्षे अविरत कार्यरत आहे. घटस्थापना म्हणजे आश्विन शुक्ल प्रतिपदेला (२६ सप्टेंबर या दिवशी) समितीच्या स्थापनेला २० वर्षे पूर्ण होत आहेत. या द्विदशकपूर्तीच्या निमित्ताने समितीचे धर्मप्रसाराचे कार्य, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय अधिक व्यापक प्रमाणात समाजात पोचवण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ देशभर राबवण्यात येणार आहे. हे अभियान ३१ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत विविध उपक्रमांद्वारे राबवण्यात येईल.

यामध्ये ‘हिंदु राष्ट्र स्थापने’ची शपथ ग्रहण करणे, मंदिरे आणि ऐतिहासिक स्थळे यांची स्वच्छता, हिंदु राष्ट्रासंदर्भात व्याख्यानांचे आयोजन, विविध जिल्ह्यांत संघटन मेळावे अन् वर्धापनदिनाच्या कार्यक्रमांचे आयोजन, हिंदु राष्ट्रविषयक चर्चासत्रे अथवा परिसंवाद यांचे आयोजन, द्विदशकपूर्तीनिमित्त विशेष संवादांचे आयोजन, समाजातील हितचिंतकांचा कृतज्ञता म्हणून सत्कार, महिलांचे संघटन, ‘सोशल मिडिया’च्या माध्यमातून हिंदु राष्ट्राचा विचार आणि समितीचे बहुआयामी कार्य सर्वदूर विविध घटकांपर्यंत पोचवण्याचे अभियान आदी विविध प्रकारचे उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

हिंदु राष्ट्र प्रसाराच्या या अभियानात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी, हितचिंतक, अर्पणदाते आणि विज्ञापनदाते या उपक्रमांमध्ये अवश्य सहभागी होऊ शकतात. वरीलपैकी कोणत्याही उपक्रमाचे आयोजन ते वास्तव्य करत असलेल्या भागात, तसेच नातेवाईक अथवा परिचित यांच्याकडे करू शकतात.

अधिक माहितीसाठी जिल्ह्यातील हिंदु जनजागृती समितीच्या जिल्हा समिती समन्वयकांना संपर्क करावा अथवा हिंदु जनजागृती समितीला पुढील क्रमांकावर संपर्क करू शकता : ७७३८२ ३३३३३

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *