Menu Close

मुसलमान पत्नी आणि मेहुणा यांनी ठार मारण्याची धमकी देऊन गोमांस खाऊ घातल्याने हिंदु तरुणाची आत्महत्या !

पोलिसांकडून पत्नी आणि मेहुणा यांच्यावर गुन्हा नोंद

  • मुसलमान तरुण ‘लव्ह जिहाद’द्वारे हिंदु तरुणींचे लैंगिक शोषण करून त्यांचे धर्मांतर करून त्यांच्यावर अत्याचार करतात, तर मुसलमान तरुणी हिंदु तरुणावर प्रेम करून त्याचा धार्मिक छळ करून त्याला आत्महत्येला प्रवृत्त करतात !
  • हिंदु तरुण आणि तरुणी यांना धर्मशिक्षण नसल्याने त्यांची अशी गत होत आहे, हे हिंदूंना आणि त्यांच्या संघटनांना लज्जास्पद ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण मिळण्यासाठी हिंदु संघटनांनी पुढाकार घेणे आवश्यक ! -संपादक 

सूरत (गुजरात) – येथील उधना पटेल नगरामध्ये २ मासांपूर्वी रोहित राजपूत (वय २७ वर्षे) या हिंदु तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याला बलपूर्वक गोमांस खाण्यास भाग पाडल्याने त्याने आत्महत्या केल्याची माहिती आता समोर आली आहे. तरुणाच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर त्याची पत्नी सोनम अली आणि तिचा भाऊ मुख्तार अली यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

२७ जून या दिवशी रोहित याने आत्महत्या केली होती; मात्र त्या वेळेला यामागील कारण स्पष्ट झाले नव्हते. काही दिवसांपूर्वी रोहितच्या आईला त्याच्या मित्रांच्या माध्यमातून कळले की, रोहितने आत्महत्या करण्यापूर्वी फेसबूकवर एक पत्र प्रसारित केले होते. त्यात त्याने सोनम अली आणि तिचा भाऊ मुख्तार अली यांना आत्महत्येसाठी उत्तरदायी ठरवले होते. ते दोघेही रोहित याला ठार मारण्याची धमकी देऊन बलपूर्वक गोमांस खाऊ घालत होते. ‘गोमांस खाल्ल्यामुळे मी या जगात रहाण्यास योग्य नाही’, असे या पत्रात सांगत रोहित याने आत्महत्या केली होती. (अंदमान येथे शिक्षो भोगत असतांना मुसलमान बंदीवान हिंदु बंदीवानांचे धर्मांतर करण्यासाठी खाद्यपदार्थांचा वापर करत असल्याचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना समजल्यावर त्यांनी, ‘संपूर्ण धर्मांधाला जरी खाल्ले, तरी कुणाचेही धर्मांतर होणार नाही’, अशा प्रकारचे विधान केल्याचे सांगितले जाते. हिंदूंना हे ठाऊक नसल्याने ते भावनेच्या आहारी जाऊन आत्मघात करून घेतात ! – संपादक) रोहित हातमाग कारखान्यामध्ये काम करत होता आणि तेथे त्याचे सोनम अली हिच्याशी प्रेम झाले होते. त्याने घरच्यांचा विरोध डावलून सोनम अली हिच्याशी लग्न केले होते.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *