-
‘कृत्रिम तलाव’ आणि ‘गणेशमूर्तीदान’ या अशास्त्रीय संकल्पना राबवून गणेशमूर्तीची घोर विटंबना थांबवा !
-
कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तीची विक्री आणि विसर्जन यांवर बंदी घाला !
पुणे – गणेशोत्सवातील तथाकथित जलप्रदूषणाचे कारण सांगून ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘गणेशमूर्तीदान’ या अशास्त्रीय संकल्पना राबवण्याच्या माध्यमातून होणारी गणेशमूर्तींची घोर विटंबना थांबवण्यात यावी. तसेच ‘राष्ट्रीय हरित लवादा’च्या आदेशानुसार कागदी लगद्यापासून बनवण्यात येणार्या श्री गणेशमूर्तींना प्रोत्साहन देण्यात येऊ नये. या पार्श्वभूमीवर त्यांची विक्री आणि विसर्जन यांवर बंदी घालण्यात यावी. अशा मागण्या करणारी निवेदने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड प्रशासन अन् महानगरपालिका प्रशासन यांना देण्यात आली.
सकारात्मक राहून कार्यवाही करीन ! – उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग, पुणे
ही निवेदने पुणे महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आली. सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी ही निवेदने स्वीकारली. ‘याविषयी सकारात्मक राहून कार्यवाही करीन’, असे ते म्हणाले. उपायुक्त, पर्यावरण विभाग, पुणे महानगरपालिका यांच्या कार्यालयातही ही निवेदने देण्यात आली.
पुण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनाही निवेदने देण्यात आली. या वेळी समितीचे श्री. कृष्णाजी पाटील, तसेच धर्मप्रेमी सर्वश्री गोपाळ शिंदे, अंकुश जगताप, विपुल मांडके, दत्तात्रय कुलकर्णी, कु. अनुष्का घाडगे, कु. आकांशा घाडगे आदी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन सादर !पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांना २९ ऑगस्ट या दिवशी निवेदन देण्यात आले. सिंह यांनी ‘कागदी लगद्यापासून गणेशमूर्ती बनवणे हे अशास्त्रीय कसे आहे’, तसेच ‘अशा मूर्तीच्या विसर्जनाने जलप्रदूषण कसे होते, यासंदर्भात राष्ट्रीय हरित लवादाकडून नोंदवण्यात आलेली निरीक्षणे’ यांसंदर्भात जाणून घेतले. या वेळी समितीचे सर्वश्री शैलेश येवले आणि रघुनाथ ढोबळे उपस्थित होते. |
स्रोत: दैनिक सनातन प्रभात