(‘जिहाद’ म्हणजे ‘इस्लामच्या शत्रूंशी पुकारलेले युद्ध’ !)
इस्लामी देशांमध्ये जिहादी, धर्मांध किंवा आतंकवादी यांची निर्मिती का होते ?’, हे यातून स्पष्ट होते ! -संपादक
अंकारा – तुर्कीयेमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘जिहाद’ शिकवला जात आहे. ‘जिहाद’ कसाही असो अल्लाच्या नावाने तो स्वीकारला, तर स्वर्गाचे द्वार खुले होते, असे मुलांना शिकवले जात आहे. हा खुलासा काही वृत्त अहवालांमध्ये करण्यात आला आहे. यात म्हटले आहे की, तुर्कीयेच्या शिक्षण मंत्रालयाने १२ वीच्या अभ्यासक्रमात जिहादचा विषय समाविष्ट केला आहे. अल्लाच्या नावाने केलेली युद्धासह प्रत्येक कृती जिहादच्या संकल्पनेत येते. ‘जिहाद हा हृदयाने, जिभेने, हाताने किंवा शस्त्राने कसा केला जाऊ शकतो’, हे त्यात स्पष्ट केले आहे. पुस्तकात लिहिले आहे की, आपले पूर्वज हौतात्म्य ही सर्वात मोठी गोष्ट मानून जिहादसाठी बाहेर पडले होते. ते म्हणाले होते, ‘मी मेलो तर मला ‘शहीद’ म्हणतील आणि जर मी वाचलो तर ‘गाझी’. (मुसलमानांमध्ये धर्मासाठी लढणारा शूर योद्धा) अशा प्रकारे आमचे पूर्वज शहीद होण्यापासून कधीच मागे हटले नाहीत.’
या पुस्तकात म्हटले आहे की,
१. जिहादला प्रोत्साहन देण्याचा उल्लेख कुराणात आहे आणि प्रेषित महंमद पैगंबर यांनी हदीसमध्येही त्याचा उल्लेख केला आहे.
२. खरे आस्तिक तेच आहेत, जे अल्ला आणि प्रेषित यांच्यावर संशय न घेता विश्वास ठेवतात आणि अल्लासाठी त्यांचे जीवन आणि संपत्ती समर्पित करतात.
३. प्रेषित महंमद पैगंबर यांनीही जिहादची आवश्यकता स्पष्ट केली आहे. ‘अल्लाच्या मार्गावर चालतांना न लढता मरणारे ढोंगी आहेत’, असे ते म्हणाले होते.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात