Menu Close

संभाजीनगर येथील जिल्हा परिषद शाळांतील मुले शाळा सोडून मदरशात जायला लागल्याचा धक्कादायक प्रकार !

मदरशांमध्ये इस्लामी आतंकवादाचे धडे दिले जात असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. हे पहाता या गंभीर प्रकरणाची चौकशी होणे आवश्यक ! -संपादक 

प्रतीकात्मक छायाचित्र

संभाजीनगर – जिल्ह्यातील काही गावांतील मुले शाळेत न येता मदरशात जात असल्याचा धक्कादायक प्रकार शाळांचे सर्वेक्षण करतांना शिक्षण विभागातील अधिकर्‍यांच्या लक्षात आले आहे. यामुळे शाळांतील उपस्थिती न्यून होत असल्याने शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी ‘शाळेत न येता परस्पर मदरशांत जात असलेल्या विद्यार्थ्यांची सूची २ दिवसांत करा’, असा आदेश जिल्ह्यातील सर्व गटशिक्षण अधिकार्‍यांना ३० ऑगस्ट या दिवशी दिला.

१. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ४ सहस्र ६०२ शाळांपैकी तब्बल ४४३ शाळा ऊर्दू माध्यमाच्या असून त्यात १८ लाख ४१९ विद्यार्थी शिकतात.

२. कोरोना महामारीच्या गंभीर स्थितीमुळे १ सहस्र २४४ मुले काही कारणामुळे शाळाबाह्य झाली, असे लक्षात आले; मात्र ही मुले मदरशात शिक्षण घेत असल्याचे नंतर आढळले.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *