वाद मिटला असल्याचे पोलीस आणि विश्वविद्याल प्रशासनाचा दावा !
गुरुग्राम (हरियाणा) – येथील जी.डी. गोयंका विश्वविद्यालयाच्या एका खोलीमध्ये मुसलमान विद्यार्थ्यांनी नमाजपठण केल्याने हिंदु विद्यार्थ्यांनी त्याचा विरोध केला. याची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोचले; मात्र कुणाकडूनही तक्रार न मिळाल्याने ते कारवाई न करता परत गेले. ही घटना ३० ऑगस्टची असल्याचे सांगितले जात आहे. मुसलमानांना स्वतंत्र खोली देण्यात आल्याचा हिंदु विद्यार्थ्यांना आरोप होता. विश्वविद्यालयाच्या प्रशासनाने सांगितले, ‘मुसलमान विद्यार्थ्यांना नमाजपठणासाठी स्वतंत्र खोली देण्यात आली, ही अफवा आहे.’ याविषयी पोलीस आणि विश्वविद्यालय प्रशासन यांनी म्हटले की, संबंधित प्रकरण मिटवण्यात आले आहे.
A group of more than 20 students at GD Goenka University in Gurugram staged a protest after some foreign students offered namaz in a football field at the university earlier this week.https://t.co/RSGduYVkL9
— IE Education Jobs (@ieeducation_job) September 3, 2022
स्रोत: दैनिक सनातन प्रभात