Menu Close

गोव्यात ‘डार्कवेब’च्या आधारे अमली पदार्थ व्यवसाय !

अमली पदार्थांच्या मोठ्या व्यावसायिकांनी गोव्यात वळवला मोर्चा

‘डार्कवेब’च्या आधारे अमली पदार्थ व्यवसाय

पणजी, ४ सप्टेंबर (वार्ता.) – देशभरात अमली पदार्थांचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय करणार्‍यांनी अलीकडच्या काळात गोव्यात मोर्चा वळवल्याचा निष्कर्ष काही अन्वेषण यंत्रणांनी काढला आहे. पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी गोव्यात अमली पदार्थ व्यवसाय ‘ऑनलाईन’ पद्धतीने होत आहे. यासाठी ‘डार्कवेब’ या इंटरनेट ब्राउझरचे साहाय्य घेऊन व्यवसाय केला जातो. तेलंगाणाचे पोलीस आयुक्त सी.व्ही. आनंद यांनी भाग्यनगर (तेलंगाणा) येथे प्रसारमाध्यमांकडे केलेले खुलासे अत्यंत धक्कादायक आहेत.

(सौजन्य : India Today) 

तेलंगाणाचे पोलीस आयुक्त सी.व्ही. आनंद यांच्या मते गोव्यात अमली पदार्थांचा प्रचंड साठा वळवण्यात आला आहे. तेलंगाणा राज्याने अमली पदार्थ व्यवहाराच्या विरोधात जोरदार मोहीम आखल्याने तेथील मोठ्या अमली पदार्थ व्यावसायिकांनी गोव्यात तळ हालवला आहे. गोव्यात सहजतने उपलब्ध होणारे अमली पदार्थ आणि तरुणवर्गाचा अमली पदार्थाच्या सेवनाकडे वाढता कल, हा चिंताजनक आहे.

गोवा पोलिसांनी चालू वर्षी जानेवारी ते जुलै या कालावधीत विविध ठिकाणी कारवाई करून एकूण ९८ किलो अमली पदार्थ कह्यात घेतले आहेत आणि याची किंमत सुमारे अडीच कोटी रुपये आहे. यामध्ये एकूण १६ स्थानिक, ३८ गोव्याबाहेरील आणि १३ विदेशी नागरिक व्यक्ती मिळून एकूण ६७ जणांना कह्यात घेण्यात आले.

‘डार्कवेब’ म्हणजे काय ?

हे म्हणजे हिमनगाचे फक्त टोक !
(अधिक माहितीसाठी चित्रावर क्लिक करा)

‘डार्कवेब’ हा एक अनधिकृत ‘वेब ब्राउझर’ आहे. त्यावर पुष्कळ संकेतस्थळे सांकेतिक स्वरूपामध्ये बनवलेल्या असतात. ‘गूगल’, ‘याहू’ यांसारख्या ‘सर्च इंजिन’वर शोधून सापडणार नाहीत, अशी संकेतस्थळे यावर उपलब्ध आहेत. अनधिकृत व्यवसायांसाठी ‘डार्कवेब’चा वापर केला जातो. याचे अन्वेषण करणे हे पोलिसांपुढील एक आव्हान आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *