हत्या करून मृतदेह झाडावर गळफास लावलेल्या स्थितीत लटकवून आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न
अशा वासनाधांना इस्लामी देशांप्रमाणे शरीयत कायद्यानुसार कमरेभर खड्ड्यात गाडून त्याला दगड मारून ठार करण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये ! -संपादक
दुमका (झारखंड) – काही दिवसांपूर्वी येथे शाहरूख नावाच्या तरुणाने अंकिता नावाच्या मुलीला पेट्रोल ओतून जाळून मारल्याची घटना घडली होती. आता श्रीअमडा गावात अरमान अन्सारी याने बलात्कार केलेली अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्याने तिचा गळा दाबून तिची हत्या केली आणि ‘ती आत्महत्या वाटावी’ म्हणून झाडावर गळफास लावलेल्या स्थितीत तिला लटकवले. अन्सारी या मुलीवर अनेक दिवसांपासून बलात्कार करत होता. ही मुलगी आदिवासी समाजातील होती. शवविच्छेदन केल्यानंतर या मुलीची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे आणि ती गर्भवती असल्याचे उघड झाले. पोलिसांनी अरमान याला अटक केली आहे.
झारखंड के दुमका में 14 साल की एक आदिवासी लड़की की हत्या… रेप के बाद मारकर पेड़ से लटकाया
अरमान अंसारी नाम के शख्स पर नाबालिग के साथ रेप और हत्या का आरोप… पुलिस ने अरमान को पॉक्सो एक्ट के तहत किया गिरफ़्तार#JharkhandRapeCase #Dumka #Murder #AdivasiGirl pic.twitter.com/7bEWB1aoMt
— India TV (@indiatvnews) September 4, 2022
ही मुलगी मजुरीचे काम करते. १४ वर्षांच्या असणार्या मुलीला कामावर जात असतांना अरमान याने पकडले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर सतत काही दिवस त्याने तिच्यावर बलात्कार केला.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात