Menu Close

अभिनेत्री मनीषा कोईराला मनःशांतीसाठी उज्जैन सिंहस्थात सहभागी !

प्रार्थनेमुळे गर्भाशयाच्या कर्करोग बरा झाल्याच्या अनुभूतीमुळे अध्यात्माकडे वळल्या !

manisha_koirala_kumbh
स्वामी पायलटबाबा यांच्या मांडवात उपस्थित अभिनेत्री मनीषा कोईराला (वर्तुळात)

उज्जैन : अभिनेत्री मनीषा कोईराला सध्या सिंहस्थात स्वामी पायलट बाबा यांच्या मांडवात दिसत आहे. साध्वीसारखे वस्त्र धारण करून जप-तप करणे, योग करणे अशी त्यांची दिनचर्या असते.

एका दैनिकात प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की, वर्ष २०१२ मध्ये त्यांना गर्भाशयाच्या कर्करोग झाला होता. त्याच्यावर त्यांनी औषधोपचार, तसेच प्रार्थना केल्या होत्या. या प्रार्थनेच्या परिणामामुळे त्यांचा कर्करोग दूर झाला. आता झगमगती चित्रपटसृष्टी सोडून काही दिवस शांततेचे जीवन जगायची इच्छा आहे. त्यामुळे इच्छा असेपर्यंत त्या इथेच रहाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

साध्वी चेतना यांच्या माध्यमांतून त्या पायलट बाबांच्या संपर्कात आल्या. दुसर्‍या अमृत स्नानातही त्यांनी सहभाग घेतला होता. तसेच अर्धकुंभालाही त्या आल्या होत्या.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *