Menu Close

विदर्भाची कुलस्वामिनी श्री अंबामातेच्या साक्षीने ‘हिंदु राष्ट्र स्थापने’ची शपथ !

हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीच्या निमित्ताने अमरावतीमध्ये ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियाना’ला प्रारंभ

हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ घेतांना धर्मप्रेमी

अमरावती ५ सप्टेंबर (वार्ता.) – हिंदु जनजागृती समिती सर्वसमावेशक अशा ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेच्या उद्देशाने अविरत कार्यरत आहे. यंदा घटस्थापनेला अर्थात् आश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदेला (२६ सप्टेंबर २०२२) या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या स्थापनेला २० वर्षे पूर्ण होत असल्याने समितीच्या द्विदशकपूर्तीच्या निमित्ताने समितीचे धर्मप्रसाराचे कार्य, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय अधिक व्यापक प्रमाणात समाजात पोचावे या उद्देशाने ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ देशभर राबवण्यात येणार आहे.

अमरावतीमध्ये या अभियानाचा आरंभ अंबादेवी मंदिरात समितीच्या महिला कार्यकर्र्त्यांनी देवीची भावपूर्ण ओटी भरून आशीर्वाद घेऊन केला. या अभियानाच्या अंतर्गत समितीच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा सहसमन्वयक श्री. प्रदीप गर्गे यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ उपस्थित सर्वांना दिली, तसेच देवीला सामूहिक प्रार्थनाही करण्यात आली.

या वेळी अंबादेवी मंदिराचे पुरोहित श्री. योगेश जोशी, समितीचे श्री. आनंद डाऊ, डॉ. सुनील ठाकरे, श्री. सुहास भुमराळकर आणि अनेक दर्शनार्थी भाविक उपस्थित होते.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *