Menu Close

चित्रपटातील तथ्य चुकीच्या पद्धतीने दाखण्याचा आरोप करत प्रसंग गाळण्याचा केरळ चित्रपट मंडळाचा आदेश – दिग्दर्शक रामसिम्हन्

केरळमधील हिंदूंच्या मोपला हत्याकांडाविषयीच्या चित्रपटाचे प्रकरण

केरळच्या साम्यवादी आघाडी सरकारच्या अखत्यारीत असलेले चित्रपट मंडळ याहून वेगळे काय करणार ? जो इतिहास आहे तो जगासमोर आलेलाच आहे, तो आता चित्रपटातून येऊ नये म्हणून आटापिटा करणारे केरळ सरकार किती धर्मांधप्रेमी आणि हिंदुविरोधी आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक 

उजवीकडे चित्रपट दिग्दर्शक रामसिम्हन्

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळच्या चित्रपट परीक्षण मंडळाने राज्यातील मोपला हत्याकांडांवर बनवलेल्या ‘पुझ्झा मुत्तुल पुझ्झा वारी’ (नदीपासून नदीपर्यंत) या चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यास जून मासात नकार दिला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक रामसिम्हन् (पूर्वीश्रमीचे अली अकबर) यांनी याविषयी म्हटले आहे, ‘मंडळाने माझ्या चित्रपटात तथ्य चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचा आरोप करत काही प्रसंग गाळण्याचा आदेश दिला आहे. असा आदेश म्हणजे मोपला दंगलीत हिंदूंचा नरसंहार करणार्‍या मुसलमानांना निर्दोष ठरवण्याचा प्रयत्न आहे.’ वर्ष १९१० मध्ये मुसलमानांनी सहस्रो हिंदूंच्या केलेल्या नरसंहाराला ‘मोपला हत्याकांड’ म्हटले जाते.

केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने हिंदु ऐवजी पूर्वीश्रमीचे मुसलमान नाव देण्यास बाध्य केले !

रामसिम्हन् पुढे म्हणाले, ‘केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने मला माझे पूर्वीश्रमीचे अली अकबर हे नाव चित्रपटामध्ये अंतर्भूत करण्यास बाध्य केले होते. मंडळाला हे दाखवायची इच्छा नाही की, एका मुसलमानाने धर्माचा त्याग करून हिंदु धर्म स्वीकारला आणि तो आता मुसलमानांच्या हिंसाचाराविषयी चित्रपट बनवत आहे.’ अली अकबर यांनी याच वर्षी जानेवारी मासामध्ये इस्लाम सोडून हिंदु धर्मात प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांनी त्यांचे नाव रामसिम्हन् ठेवले आहे. वर्ष १९४७ मध्ये रामसिम्हन्, त्यांचा भाऊ दयासिम्हन्, त्याची पत्नी कमला, स्वयंपाकी राजू अय्यर आणि अन्य नातेवाईक यांना त्यांनी इस्लाम सोडून हिंदु धर्म स्वीकारल्यावरून मुसलमानांनी ठार केले होते. त्यावरूनच अली अकबर यांनी स्वतःचे नाव रामसिम्हन् ठेवले आहे.

चित्रपट प्रदर्शित न होण्यासाठी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा दबाव

रामसिम्हन यांनी पुढे सांगितले की, केरळ चित्रपट मंडळाने प्रमाणपत्र देण्यास नकार दिल्यानंतर केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाकडे तो पाठवण्यात आल्यावर त्यांनी काही प्रसंग काढून टाकण्यास सांगितले आहेत. मला संशय आहे की, केरळच्या चित्रपट मंडळाने केंद्रीय मंडळावर दबाव आणला आहे. तसेच हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये, यासाठी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाही दबाव निर्माण करत आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *