Menu Close

व्यापार्‍यांनी संघटित होऊन ‘हलाल जिहाद’चे संकट रोखावे – श्री. रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

श्री. रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

पुणे, ८ सप्टेंबर (वार्ता.) – ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या माध्यमातून आज हलाल अर्थव्यवस्था केवळ ८ वर्षांत ३ ट्रिलीयनपर्यंत गेली आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेला ही संख्या गाठण्यासाठी ७५ वर्षे लागली. इतक्या मोठ्या प्रमाणात हलाल अर्थव्यवस्थेचा प्रभाव संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेत झाला आहे. हे असेच चालू राहिले, तर काही वर्षांत सर्व व्यापार्‍यांची अर्थव्यवस्था संपुष्टात येईल. यासाठी आता सर्व व्यापार्‍यांनी संघटित होऊन ‘हलाल जिहाद’चे संकट रोखावे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले. पिंपळे गुरव येथील रामकृष्ण कार्यालयात २९ ऑगस्ट या दिवशी येथील व्यापार्‍यांसाठी श्री. शंकर जगताप यांच्या वतीने ‘हलाल जिहाद’ या विषयावर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या बैठकीत श्री. रमेश शिंदे यांनी हलाल जिहादच्या भीषण संकटाविषयी उपस्थितांना अवगत करून दिले. या बैठकीला १९५ हून अधिक व्यापारी आणि व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, तसेच १४० नागरिक अन् कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीचे आयोजन सर्वश्री संजय मराठे, राहुल साळुंके आणि अन्य पदाधिकारी यांनी केले होते. कार्यक्रमस्थळी सर्वश्री सागर आंघोळकर, अमर अदियाल, शशिकांत कदम, महेश जगताप, राजेंद्र राजापुरे, उषाताई मुंडे, शारदा सोनवणे, अभिषेक बारणे, विनोद तापकीर, प्रमोद ताम्हणकर, संदीप नखाते, रमेश काळे, गणेश कसपटे, शेखर चिंचवडे हे मान्यवरही उपस्थित होते.

श्री. रमेश शिंदे ‘पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन’द्वारे ‘हलाल सर्टिफिकेशन’चा विषय समजावून सांगतांना आणि खाली उपस्थित राष्ट्र आणि धर्मप्रेमी

प्रारंभी रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री. रमेश शिंदे, श्री. पराग गोखले आणि कु. क्रांती पेटकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर श्री. रमेश शिंदे यांनी ‘पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन’द्वारे ‘हलाल सर्टिफिकेशन’चा भारतीय अर्थव्यवस्थेत झालेला शिरकाव, हलाल अर्थव्यवस्थेतून जिहादी आतंकवाद्यांना होणारे साहाय्य अशा सर्व महत्त्वपूर्ण सूत्रांची माहिती उपस्थितांना दिली. या बैठकीच्या माध्यमातून ‘हलाल प्रमाणपत्र’ आणि हलाल जिहाद यांविषयी जागृती करणार्‍या ‘हलाल जिहाद ? ’ या ग्रंथाचे वितरणही झाले.

मार्गदर्शन ऐकल्यानंतर उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलेले मनोगत –

१. श्री. राजेंद्र चिंचवडे (व्यापारी आघाडी, भाजप, पिंपरी-चिंचवड) – आज हा विषय ऐकल्यावर व्यापार्‍यांमध्ये याविषयी जागृती होणे आवश्यक आहे, हे लक्षात आले. आम्हाला या विषयावर ठिकठिकाणी बैठकांचे आयोजन करण्यासाठी समितीचे सहकार्य हवे आहे. अशा बैठकांचे आयोजन करून ‘हलाल जिहाद’च्या संकटाला निश्चितपणे हद्दपार करू !

२. श्री. अंतेश्वर टेकळे – मी प्रतिज्ञा करतो की, देशाच्या अर्थव्यवस्थेचे संरक्षण व्हावे, यासाठी आजपासून मी अथवा माझे कुटुंबीय कोणतीही हलाल प्रमाणित वस्तू खरेदी करणार नाही ! याविषयी समाजातही जागृती करणार !

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *