देहली – येथील ग्रेटर कैलाश येथे असलेल्या ‘मालाकुमार इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या आस्थापनामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘मानवाधिकार’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. याचा लाभ आस्थापनातील २५ कर्मचार्यांनी घेतला.
या वेळी मानवाधिकार म्हणजे काय ? मानवाधिकार सुरक्षित कसे ठेवावे ? मानवाधिकारांचे उल्लंघन होत असतांना एक सामान्य नागरिक म्हणून आपण काय करू शकतो ? इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. ‘देशाचे नागरिक म्हणून आम्ही या मानवाधिकारांचे अधिकारी आहोत. त्यामुळे ते समजून घेणे आवश्यक आहे’, असे अधिवक्त्या अमिता सचदेवा यांनी सांगितले. या कार्यक्रमात टुपुर भट्टाचार्य यांनीही सहभाग घेतला.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात