Menu Close

महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी आणि धर्मांतर बंदी कायदा तात्काळ लागू करा !

हिंदु जनजागृती समिती प्रणित महिला शाखा रणरागिणीची आंदोलनात मागणी

आंदोलन करतांना कार्यकर्ते

अमरावती – गेल्या ८ दिवसांत अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुली बेपत्ता होऊन त्यांचा लैंगिक छळ करण्यात आल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या घटनांमधील आरोपी धर्मांध आहेत. त्यामुळे लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवणे, हिंदु तरुणींना फसवून त्यांचा लैंगिक छळ करणे, त्यांना डांबून ठेवणे, धर्मांतर करण्याची बळजोरी करणे या घटना वाढत आहेत. यासाठीच महाराष्ट्र राज्यात तात्काळ लव्ह जिहादविरोधी आणि धर्मांतर बंदी कायदा लागू करावा, या मागणीसाठी ११ सप्टेंबर या दिवशी राजकमल चौकात हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेकडून हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात करण्यात आलेल्या मागण्या !

१. ‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी देशात ‘धर्मांतरबंदी कायदा’, तसेच लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करून त्याची कठोरपणे कार्यवाही करावी.

२. ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे हाताळण्यासाठी वा त्यांचा शोध घेण्यासाठी केंद्र आणि राज्य स्तरावर पोलिसांची विशेष शाखा स्थापन करावी. अशा प्रकरणांमध्ये ‘लव्ह जिहाद’च्या नावाखाली गुन्हे नोंद करावेत.

३. ‘लव्ह जिहाद’साठी विदेशातून होणारा अर्थपुरवठा, युवतींची तस्करी आणि त्यांचा आतंकवादी कारवायांसाठी होणारा वापर यांची केंद्रशासनाने चौकशी करून हे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी कठोर उपाययोजना करावी.

४. अशा प्रकरणांत जर पीडित युवतीचे/स्त्रीचे लग्न झाले असेल, तर तिच्या इच्छेनुसार त्वरित घटस्फोट मिळण्याची तरतूद असावी. अशा घटस्फोटप्रकरणी आरोपी, त्याचे नातेवाईक यांच्या मालमत्तेतील अर्धा वाटा पीडित महिलेला मिळण्याची तरतूद असावी.

५. तत्कालीन काँग्रेस शासनाने माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी समिती नेमली होती. अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही धर्मांतरबंदी कायदा लागू करावा, अशी महत्त्वपूर्ण शिफारस २९ नोव्हेंबर २०१४ या दिवशी एका अहवालाद्वारे शासनाला करण्यात आली होती. हा अहवाल विधीमंडळात उघड करण्यात यावा, अशी आमची मागणी आहे.

६. देशातील गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, उत्तरप्रदेश, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, ओडिशा, झारखंड, कर्नाटक या १० राज्यांत धर्मांतरबंदी कायदा अस्तित्वात असून गोवा राज्यही हा कायदा करण्याच्या विचारात आहे. तरी महाराष्ट्रातही कठोर ‘धर्मांतरबंदी कायदा’ करावा. हा कायदा काळाची आवश्यकता आहे. यासाठी तात्काळ अध्यादेश काढण्यात यावा आणि कायदा संमत करण्यात यावा.

या वेळी मागण्या करून झाल्यावर उपस्थितांनी ‘लव्ह जिहाद’चा निषेध करण्याच्या घोषणा दिल्या.

हिंदु युवती आणि त्यांचे पालक यांनी वेळीच ‘लव्ह जिहाद’चे षड्यंत्र ओळखून सावध व्हावे ! – सौ. अनुभूती टवलारे, रणरागिणी शाखा

अमरावती येथील धारणी येथे रुग्णवाहिकेचा चालक असणार्‍या धर्मांधाने येथील उच्च विद्याविभूषित हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला ३ दिवस घरात डांबून ठेवले होते. तरुणीची प्रकृती खालावल्याने तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांचा विवाह अनधिकृत पद्धतीने करण्यात आला होता. त्यामुळे याकडे केवळ प्रेमविवाह म्हणून न बघता हिंदु युवती आणि त्यांचे पालक यांनी वेळीच हे षड्यंत्र ओळखून सावध व्हावे. आपली यात फसवणूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे अशा षड्यंत्राला बळी पडू नये, यासाठी हिंदु युवतींनी धर्माचरण करावे आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण शिकून घ्यावे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *