Menu Close

कोटमी (जिल्हा अमरावती) येथे शाहरूखकडून हिंदु तरुणीचे अपहरण आणि हत्या – खासदार अनिल बोंडे यांचा आरोप

  • अमरावती येथे पुन्हा ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण !

  • खासदारांची पोलीस अधीक्षक आणि गृहमंत्री यांच्याकडे तक्रार !

  • स्वतःला अल्पसंख्यांक म्हणवणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !
  • अशा घटनांविषयी काँग्रेस, साम्यवादी पक्ष, समाजवादी पक्ष, बसप, पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी किंवा इस्लामी संघटना तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
  • शिंदे गट आणि भाजप यांच्या राज्यात धर्मांधांचे असे धाडस पुन्हा होऊ नये; म्हणून सरकारने अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ! -संपादक 

अमरावती, ११ सप्टेंबर (वार्ता.) – जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील कोटमी येथील १९ वर्षीय हिंदु आदिवासी तरुणीची ‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्राच्या अंतर्गतच हत्या झाली आहे, असा आरोप येथील भाजपचे राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे. ‘जिल्ह्यातील परतवाडा येथील शाहरूख उपाख्य जाकीर याने प्रथम हिंदु तरुणीचे अपहरण करून नंतर तिची हत्या केली’, असेही त्यांनी सांगितले.

खासदार डॉ. अनिल बोंडे म्हणाले,

१. कोटमी येथील हिंदु तरुणीला शाहरूख याने २० जुलै या दिवशी पुणे येथे पळवून नेले होते. गावात पंचायत बसल्यानंतर या तरुणीला पुणे येथे रहात असलेल्या आदिवासी युवकांच्या साहाय्याने १७ ऑगस्ट या दिवशी गावात परत आणण्यात आले होते.

२. १८ ऑगस्ट या दिवशी शाहरूख याने त्याच्या मित्राच्या साहाय्याने कोटमी येथे येऊन त्या तरुणीला पुन्हा दुचाकीवरून पळवून नेले. १९ ऑगस्टच्या रात्री गावातील विहिरीत या तरुणीचा मृतदेह गावकर्‍यांना आढळला होता.

३. ‘शाहरूख याने आपल्या मित्राच्या साहाय्याने माझ्या मुलीची हत्या केली आहे’, अशी तक्रार तरुणीच्या वडिलांनी चिखलदरा पोलीस ठाण्यात प्रविष्ट केली आहे; मात्र ‘पोलिसांनी या प्रकरणात कोणतीही कारवाई केली नाही’, अशी तक्रार तरुणीच्या वडिलांनी माझ्याकडे केली आहे.

४. चिखलदरा पोलीस या तरुणीच्या हत्येचे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी शाहरूख याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी तक्रारीद्वारे मागणी केली आहे, तसेच या प्रकरणाची तक्रार गृहमंत्र्यांकडेही केली आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *