Menu Close

पारंपरिक पोशाखातील महिलांना समुद्रकिनार्‍यावर मद्याच्या बाटल्यांसह दाखवलेले ‘जहाँ चार यार’ या चित्रपटाचे आक्षेपार्ह पोस्टर प्रदर्शित !

स्वत:च्या मर्जीप्रमाणे वागण्यासाठी विवाहित महिला घरातून पळून गेल्याचे दाखवून भारतीय स्त्रियांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न !

  • भारतीय कुटुंबव्यवस्थेवर आघात करणारेे आणि चंगळवादाला प्रोत्साहन देणारे असे चित्रपट भारतियांनी स्वत:चे पैस व्यय करून का पहावे ?
  • घरातील स्त्रीवर अन्याय होत असेल, तर योग्य पद्धतीने त्यातून मार्ग काढता येऊ शकतो; महिलांची पुरुषप्रधान संस्कृतीच्या विरोधातील प्रतिक्रिया म्हणून त्यांना ‘चंगळवादी बनलेले दाखवणे’, हे सर्वथा अयोग्य आहे !
  • ‘कुटुंबात अन्याय होत आहे’, असे भारतीय कुटुंबातील एखाद्या स्त्रीला वाटले, तरी ती कधी या चित्रपटाच्या ‘ट्रेलर’मध्ये दाखवल्याप्रमाणे मौजमजा करणे, मद्य पिणे, बाहेर जाऊन ओरडून शिव्या देणे असे करत नाही. चित्रपटाचा समाजावरील प्रभाव लक्षात घेता त्याचे अंधानुकरण केले जाऊ शकते, हेही लक्षात घेतले पाहिजे ! -संपादक 

मुंबई – पारंपरिक भारतीय पद्धतीने साडी नेसलेल्या स्त्रिया समुद्रकिनार्‍यावर मद्याच्या बाटल्या घेऊन चालत असल्याचे ‘जहाँ चार यार’ या चित्रपटाचे भित्तीपत्रक नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. कुटुंबामध्ये अन्याय होत असल्यामुळे स्वत:च्या मनाप्रमाणे वागण्यासाठी ४ विवाहित महिला घरातून पळून गोवा येथे गेल्याचे आणि तेथे मद्य पिणे, पबमधील पार्टीत नाचणे, अश्‍लील शिव्या देणे आदी स्वैराचारी वागत असल्याचे चित्रपटाच्या ‘ट्रेलर’मध्ये (चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्यातील आशय सारांशरूपाने दाखवणारा व्हिडिओमध्ये)दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाचे निर्मिता कमल पांडे आणि दिग्दर्शक विनोद बच्चन हे आहेत. १६ सप्टेंबर या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

१. कौटुंबिक कलह किंवा पुरुषप्रधान संस्कृती यांमुळे स्त्रियांवर होणार्‍या अन्यायाच्या विरोधातील प्रतिक्रिया म्हणून एक महिला तिच्या मैत्रिणींचे ‘प्रबोधन’ करते आणि त्यांना चंगळवादी गोष्टी करण्यासाठी उद्युक्त करते, असे या चित्रपटाच्या ‘ट्रेलर’मध्ये दाखवण्यात आले आहे. कुटुंबातील गळचेपीच्या विरोधातील प्रतिक्रिया किंवा बंड म्हणून ‘पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करणे’ हे योग्य नव्हे. अशा प्रकारच्या चंगळवादी स्त्रीमुक्तीवादी भूमिकेमुळे भारतीय कुटुंबव्यवस्थेची अपकीर्ती होत आहे, तसेच विवाहित महिलांच्या स्वैराचाराचे उदात्तीकरण होत आहे, असे चित्रपटाला विरोध करणार्‍यांकडून सांगण्यात येत आहे.

२. यामध्ये महिला अश्‍लील शिव्या देतांनाही दाखवण्यात आले आहे. भारतामध्ये  सर्वसामान्य कुटुंबातील महिला या कुटुंबवत्सलच आहेत. कुटुंबात कलह होत असतात; परंतु सर्वसामान्य कुटुंबातील भारतीय महिला अशा प्रकारे मद्य मेजवान्या किंवा अन्य  चंगळवादी गोष्टींच्या आहारी जात नाहीत. त्यामुळे कुटुंबात काही कलह झाल्यास महिलांना या चित्रपटातून चुकीचा संदेश जाण्याची दाट शक्यता आहे, असे लोकांचे म्हणणे आहे.

३. या चित्रपटात चंगळवादी वागणार्‍या महिलांना पारंपरिक पद्धतीने साडी परिधान केलेले दाखवण्यात आले आहे. वस्तूस्थितीशी विसंगत कपोकल्पित प्रकार दाखवून एकप्रकारे यातून भारतीय कुटुंबव्यवस्था, भारतीय महिला यांचे अयोग्य सादरीकरण केले गेले आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *