Menu Close

‘थँक गॉड’ चित्रपटाच्या विरोधात जौनपूर (उत्तरप्रदेश) येथे पोलिसात गुन्हा नोंद !

चित्रपटातून हिंदूंची देवता चित्रगुप्त यांचे विडंबन केल्याचे प्रकरण

  • हिंदूंच्या देवतांचे विडंबन झाल्यावर तक्रार का प्रविष्ट करावी लागते ? ‘बहुसंख्य हिंदूंच्या देशामध्ये सरकारनेच यावर कारवाई करायला हवी’, असेच समस्त हिंदु जनतेला वाटते.
  • ‘हिंदूंच्या देवतांच्या सर्रास होणार्‍या विडंबनावर कोणतीच कारवाई होत नाही.  हिंदूंच्या सहनशीलतेचा अंत पाहिला जात आहे’, असे वाटून कुणा हिंदूने कायदा हातात घेतला, तर काय होईल, याचा सरकारने आधीच विचार करून आतातरी ईशनिंदा कायदा करायला हवा, असेही हिंदूंना वाटते ! -संपादक 
चित्रपटाचे अभिनेते अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा

जौनपूर (उत्तरप्रदेश) – ‘थँक गॉड’ या चित्रपटाच्या प्रसारित झालेल्या ‘ट्रेलर’मध्ये (चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्यातील आशय सारांशरूपाने दाखवणार्‍या व्हिडिओमध्ये) हिंदूंची देवता चित्रगुप्त यांचे विडंबन करण्यात आल्याने हिमांशू श्रीवास्तव नावाच्या एका धर्मप्रेमी हिंदूने पोलिसात तक्रार प्रविष्ट केली आहे. पोलिसांनी चित्रपटाचे अभिनेते अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा आणि दिग्दर्शक इंदर कुमार यांच्या विरोधात गुन्हा नोंदवल्यावर जौनपूरच्या दिवाणी न्यायालयाने याचिकेवर १८ नोव्हेंबर या दिवशी सुनावणी करणार असल्याचे सांगितले आहे. ‘चित्रपट २५ ऑक्टोबर या दिवशी प्रसारित होणार असल्याने सुनावणीची दिनांक एवढ्या पुढची का ठेवली ?’, असा प्रश्‍न सामाजिक माध्यमांतून विचारला जात आहे.

काय आहे प्रकरण ?

‘ट्रेलर’मध्ये दाखवण्यात आलेल्या एका प्रसंगामध्ये अभिनेते अजय देवगण स्वत:ला ‘चित्रगुप्त’ असल्याचे सांगतात आणि अभिनेते सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या कर्माच्या हिशोबाच्या गोष्टी करतात. या वेळी देवगण यांचे संवाद देवतेची खिल्ली उडवण्यासारखे आहेत. या वेळी देवगण म्हणजेच चित्रगुप्ताच्या शेजारी अर्धनग्न मुली उभ्या असल्याचे दिसत आहे.

तक्रारदार हिमांशू श्रीवास्तव यांनी सांगितले की, भगवान चित्रगुप्त न्यायाची देवता आहे. ते कर्मांचा हिशोब करून पाप आणि पुण्य यांचा लेखाजोखा ठेवतात. यानुसार ‘मनुष्याला दंडित अथवा पुरस्कृत करायचे ?’, ते ठरवले जाते. चित्रपटात चित्रगुप्ताचा अवमान केल्याने आमच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *