Menu Close

राज्यात लव्ह जिहादविरोधी आणि धर्मांतरबंदी कायदा तात्काळ लागू करण्यासाठी नगर येथे रणरागिणी शाखेचे आंदोलन

आंदोलनात सहभागी झालेले आणि घोषणा देतांना हिंदुत्वनिष्ठ

नगर – गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मुली बेपत्ता होऊन त्यांचा लैंगिक छळ करण्यात आल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या घटनांमधील आरोपी हे धर्मांध आहेत. यासाठीच राज्यात तात्काळ लव्ह जिहादविरोधी आणि धर्मांतरबंदी कायदा लागू करण्यात यावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या कु. प्रतीक्षा कोरगावकर यांनी केली. १४ सप्टेंबर या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथे रणरागिणी शाखेकडून हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले. त्यात त्या बोलत होत्या. या आंदोलनाला वेगवेगळ्या संघटनांचे १५० हून अधिक प्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

या आंदोलनामध्ये छावा संघटनेचे जिल्हाप्रमुख सुरेखा सांगळे; भाजप महिला जिल्हाध्यक्ष अंजली वल्लाकट्टी, भाजप महिला प्रदेश सदस्य सुरेखा विद्ये, माजी उपमहापौर गीतांजली काळे, भाजपच्या गीता गिल्डा, वंदना पंडित, प्रिया जानवे; शिवसेना महिला मोर्चा शहरप्रमुख अरुणा गोयल; हिंदुत्वनिष्ठ डॉ. सुपर्णा देशमुख; ओबीसी जिल्हाध्यक्ष रेखा विधाते; ‘शिवराष्ट्र सेने’चे संतोष नवसुपे, हिंदुराष्ट्र सेनेचे सर्वश्री केशव मोकाटे, निखिल घंगेकर, रुद्रेश अंबाडे; ‘वंदे मातरम् ग्रुप’चे सर्वश्री महावीर कांकरिया, रवी किथानी; ‘केसरी प्रतिष्ठान’चे सर्वश्री सुरेश लालबागे, रोहित कोडम; बजरंग दलाचे श्री. कुणाल भंडारी; प्रसिद्ध उद्योजक श्री. प्रदीप पंजाबी; श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख श्री. बापू ठाणगे; ‘होय हिंदूच ग्रुप’चे श्री. दिनेश हिरगुडे, ‘धर्मजागरण’चे श्री. अभिमन्यू जाधव; ‘मातृस्नेह प्रतिष्ठान’चे श्री. रवींद्र लकशेट्टी आदी उपस्थित होते.

आंदोलनाचे चित्रीकरण काही संदिग्ध व्यक्ती करत आहेत, असे दिसल्यावर हिंदुत्वनिष्ठांनी सतर्कतेने स्वत:हून त्यांना जाब विचारला.

सहभागी हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केलेले विचार

१. अधिवक्ता गोरक्षनाथ तांदळे – लव्ह जिहाद हे हिंदु मुलींना फसवण्याचे षड्यंत्र असून या विरोधात सर्वांनी एकत्रित लढा देणे आवश्यक आहे.

२. डॉ. सुपर्णा देशमुख, हिंदुत्वनिष्ठ – महिला आणि मुली यांच्या सुरक्षिततेसाठी या आंदोलनाच्या माध्यमातून हा लढा चालू झाला असून आता कायदा होईपर्यंत तो असाच चालू राहील.

३. श्री. महावीर कांकरिया, वंदे मातरम् ग्रुप – लव्ह जिहाद आणि धर्मांतर या समस्या पुष्कळ गंभीर असून या सर्वांच्या विरोधात एकत्र येणे ही काळाची आवश्यकता आहे.

४. श्री. निखिल घंगेकर, हिंदु राष्ट्र सेना – नगर शहरातील माता-भगिनींना त्रास देणार्‍यांच्या विरोधात वारंवार तक्रार देऊनही प्रशासन काही करत नाही, ही गोष्ट गंभीर असून याला आळा घालण्यासाठीच लव्ह जिहादविरोधी आणि धर्मांतरबंदी कायदा होणे आवश्यक आहे.

क्षणचित्रे

१. रस्त्यावरून ये-जा करणारे काही हिंदू आंदोलनात सहभागी झाले.

२. ‘सुदर्शन न्यूज’ वृत्तवाहिनीने आंदोलनाची ‘पोस्ट’ पाहून पूर्वप्रसिद्धीसाठी राष्ट्रीय बातमी सिद्ध केली.

३. सावरकर चौक, चितळे रोड परिसर घोषणांनी दुमदुमून गेला.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *